"मला सवत आणलीस...", निमिष कुलकर्णीच्या लग्नानंतर शिवाली परबची प्रतिक्रिया चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 15:22 IST2025-12-06T15:21:10+5:302025-12-06T15:22:37+5:30
अभिनेत्री शिवाली परबही निमिषच्या लग्नाला उपस्थित होती. निमिषच्या लग्नानंतर शिवालीने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.

"मला सवत आणलीस...", निमिष कुलकर्णीच्या लग्नानंतर शिवाली परबची प्रतिक्रिया चर्चेत
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निमिष कुलकर्णीने लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. शुक्रवारी(५ डिसेंबर) निमिषचा लग्नसोहळा पार पडला. कोमल भास्कर हिच्यासोबत लग्न करत निमिषने त्याच्या वैवाहिक जीवनाला सुरुवात केली आहे. निमिषच्या लग्नातील फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. निमिषच्या लग्नाला मराठी कलाविश्वातील सेलिब्रिटींनी आणि हास्यजत्रेतील कलाकारांनीही हजेरी लावली होती. अभिनेत्री शिवाली परबही निमिषच्या लग्नाला उपस्थित होती. निमिषच्या लग्नानंतर शिवालीने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.
शिवाली, निमिष आणि समीर चौघुले यांचं "शिवाली हे खरंय का?" हे स्किट लोकप्रिय ठरलं होतं. या स्किटमध्ये शिवाली आणि निमिष नवरा-बायकोच्या भूमिकेत होते. त्यांची जोडीही प्रेक्षकांना आवडायची. त्यामुळे आता लग्न झाल्यानंतर शिवाली निमिषला गमतीत म्हणाली, "शेवटी मला सवत आणलीस... आता माझे बाबा येतील बघ कसे". शिवालीच्या या वक्तव्यानंतर सगळेच हसायला लागले. शिवालीने निमिषच्या लग्नातले फोटो पोस्ट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, निमिषने अनेक मालिका आणि नाटकांमध्ये काम केलं आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रामुळे त्याला प्रसिद्धी मिळाली. तर निमिषची पत्नी कोमल भास्करदेखील मराठी इंडस्ट्रीत सक्रिय आहे. कोमल अनेक मालिकांचे क्रिएटिव्ह हेड म्हणून काम पाहते. लग्नासाठी निमिष आणि कोमलने खास पारंपरिक लूक केला होता.