Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 18:56 IST2026-04-10T18:56:04+5:302026-04-10T18:56:45+5:30
Sanoj Mishra, Monalisa And Farman Khan : महाकुंभमधील व्हायरल गर्ल मोनालिसाने ११ मार्च २०२६ रोजी फरमान खानसोबत लग्न केलं होतं. तेव्हापासूनच मोनालिसाच्या वयावर प्रश्न उपस्थित केले जात होते.

Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
महाकुंभमधील व्हायरल गर्ल मोनालिसाने ११ मार्च २०२६ रोजी फरमान खानसोबत लग्न केलं होतं. तेव्हापासूनच मोनालिसाच्या वयावर प्रश्न उपस्थित केले जात होते. अभिनेत्रीचं कुटुंब आणि दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी ती अल्पवयीन असल्याचा दावा केला होता, तर दुसरीकडे फरमानने सर्व आरोप फेटाळून लावत मोनालिसा १८ वर्षांची असल्याचं सांगितलं होतं. मात्र आता मोनालिसाच्या खऱ्या वयाचा खुलासा झाला आहे. राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाच्या (NCST) तपासात ती अल्पवयीन असल्याचं समोर आलं आहे.
आयोगाच्या अहवालानुसार, लग्नाच्या वेळी मोनालिसा १६ वर्षे, २ महिने आणि १२ दिवसांची होती. यानंतर आता फरमानविरुद्ध पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयोगाचा निकाल आल्यानंतर दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी 'सत्याचा विजय झाला' असं म्हटलं आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, "मोनालिसा अल्पवयीन असल्याचं सिद्ध झालं आहे. सत्याचा विजय होत आहे आणि लव्ह-जिहादचा पर्दाफाश झाला आहे. जिहादी आता जेलमध्ये जाणार."
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
काय म्हणाले सनोज मिश्रा?
सनोज मिश्रा व्हिडिओमध्ये म्हणतात, "तुम्ही पाहिलंच असेल की कशा प्रकारे लव्ह जिहादला बळी पाडून मोनालिसाला केरळला नेण्यात आलं. तिला जाळ्यात ओढून तिच्याशी लग्न करण्यात आलं. मी पहिल्या दिवसापासून या षडयंत्राच्या विरोधात होतो आणि पीडित कुटुंबाच्या पाठीशी उभा राहिलो. तिच्या आई-वडिलांनी सुरुवातीपासूनच ती अल्पवयीन असल्याचं सांगितलं होतं. मी हा मुद्दा अनेक व्यासपीठांवर मांडला आणि मध्य प्रदेश पोलिसात तक्रारही केली होती. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने याची दखल घेऊन कारवाईचे आदेश दिले होते."
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
डिसेंबर २००९ मध्ये झाला जन्म
"राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाने केलेल्या तपासात मोनालिसा अल्पवयीन असल्याचं सिद्ध झालं आहे. या लग्नात PFI आणि CPI-M ने ज्या प्रकारे सहभाग दाखवला, त्याबद्दल आयोगाने चिंता व्यक्त केली आहे. आयोगाच्या मते, प्रेमाचा खोटा नॅरेटिव्ह पसरवण्यात आला. तिचे आधार कार्ड बनावट होते, ज्यामध्ये तिचे वय १८ वर्षे दाखवण्यात आलं होतं. प्रत्यक्षात महेश्वरच्या सरकारी रुग्णालयात तिचा जन्म डिसेंबर २००९ मध्ये झाला होता. या आधारावर फरमानवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे."
"मुलाने समाजासमोर आमचं नाक कापलं"; मोनालिसाशी लग्न केल्याने फरमान खानच्या वडिलांनी तोडलं नातं
"फरमान गुन्हेगार, साधू बनून भेटला आणि मोनालिसाला फसवलं"; सनोज मिश्रांचा धक्कादायक दावा
"मी अन्यायाविरुद्ध लढत राहेन"
फरमानच्या सांगण्यावरून मोनालिसाने सनोज यांच्यावर छेड काढल्याचे खोटे आरोप लावले होते. तिने स्वतःच्या आई-वडिलांवरही आरोप केले होते. सनोज यांच्या मते, मोनालिसाचं ब्रेनवॉश करण्यात आलं होतं. ते म्हणाले, "मला अडकवण्यासाठी तिच्या मनात माझ्याविरुद्ध विष कालवण्यात आलं. या वादांमुळे मला अनेकदा जीव द्यावासा वाटला, पण देवाने मला शक्ती दिली. लव्ह जिहाद आणि धर्मांतरावर चित्रपट बनवणं हा माझा गुन्हा आहे का? माझा आवाज कोणीही दाबू शकत नाही, मी अन्यायाविरुद्ध लढेन."