'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर 'या' दिवशी येणार? सलमान खानच्या सिनेमाची चाहत्यांमध्ये उत्सुकता
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 16:46 IST2025-12-22T16:45:33+5:302025-12-22T16:46:07+5:30
सलमान खान गेल्या काही महिन्यांपासून 'बॅटल ऑफ गलवान'चं शूट करत होता.

'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर 'या' दिवशी येणार? सलमान खानच्या सिनेमाची चाहत्यांमध्ये उत्सुकता
अभिनेता सलमान खानचे गेले काही सिनेमे सलग आपटले. 'सिकंदर' सिनेमाकडून अपेक्षा होती मात्र तोही चालला नाही. आता सलमान आगामी 'बॅटल ऑफ गलवान' सिनेमात दिसणार आहे. गलवान खोऱ्यात झालेल्या भारत विरुद्ध चीन संघर्षावर हा सिनेमा आधारित आहे. यामध्ये सलमान भारतीय सैन्य अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. दरम्यान सिनेमाचा टीझर कधी येणार याबद्दल अपडेट समोर आलं आहे.
सलमान खान गेल्या काही महिन्यांपासून 'बॅटल ऑफ गलवान'चं शूट करत होता. लडाखमध्ये मायनस डिग्री तापमानातही त्याने शूटिंग केलं. सिनेमाच्या टीझर-ट्रेलरची चाहत्यांना उत्सुकता आहे. 'बॉलिवूड हंगामा' रिपोर्टनुसार, सिनेमाची टीम काही दिवसांपासून टीझरवर काम करत आहे. येत्या २७ डिसेंबर रोजी टीझर रिलीज होईल अशी चर्चा आहे. याचं कारण म्हणजे सलमानचा त्या दिवशी ६० वा वाढदिवस आहे. हेच औचित्य साधून सलमानकडून चाहत्यांना सरप्राईज गिफ्ट मिळू शकतं अशी चर्चा आहे. सिनेमात सलमान आतापर्यंतच्या सर्वात वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.
'बॅटल ऑफ गलवान'बद्दल
अपूर्व लाखिया दिग्दर्शित 'बॅटल ऑफ गलवान' हा चित्रपट २०२० मध्ये गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैन्यांमध्ये झालेल्या संघर्षावर आधारित आहे. या संघर्षात कोणत्याही शस्त्रांचा किंवा बंदुकीचा वापर झाला नव्हता. या चित्रपटात सलमान खान बिहार रेजिमेंटचे कर्नल बी. संतोष बाबू यांची भूमिका साकारणार आहे. कर्नल संतोष बाबू यांना या संघर्षात वीरमरण आले होते, आणि त्यांना मरणोत्तर महावीर चक्राने सन्मानित करण्यात आले होते. या चित्रपटात अभिनेत्री चित्रांगदा सिंगदेखील मुख्य भूमिकेत आहे.