सलमान खानने पहिल्यांदाच शेअर केला त्याच्या गोंडस कुत्र्याचा फोटो; नाव ठेवलंय खूपच खास
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 19:15 IST2026-01-11T19:12:53+5:302026-01-11T19:15:20+5:30
सलमान खानच्या क्युूट आणि गोंडस कुत्र्याला पाहून नेटकऱ्यांनी दर्शवलं प्रेम. बातमीवर क्लिक करुन फोटो नक्की बघाच

सलमान खानने पहिल्यांदाच शेअर केला त्याच्या गोंडस कुत्र्याचा फोटो; नाव ठेवलंय खूपच खास
बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानने आपल्या आयुष्यातील 'सुख' नक्की कशात आहे, याचा उलगडा सोशल मीडियावर केला आहे. सलमानने नुकतेच दोन अत्यंत खास फोटो शेअर केले असून, हे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. या फोटोंनी सलमानचे आपल्या पाळीव प्राण्यांवरील प्रेम पुन्हा एकदा जगासमोर मांडले आहे. सलमानसोबत त्याचा पांढऱ्या रंगाचा गोंडस कुत्रा पाहायला मिळत आहे.
सलमानने इन्स्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तो त्याच्या एका पाळीव कुत्र्यासोबत खेळताना दिसत आहे. या श्वानाचे नाव त्याने 'सुख' (Sukh) असे ठेवले असून, त्याने या पोस्टला "माझं सुख" (My Sukh) असे कॅप्शन दिले आहे. शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये सलमानने 'सुख'च्या खांद्यावर हात ठेवला असून तो कॅमेऱ्याकडे पाहून पोज देत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये त्याने आपल्या लाडक्या 'सुख'ला मिठीत घेतले आहे.
या फोटोंमध्ये सलमान कॅज्युअल लूकमध्ये दिसत असून त्याने डोक्यावर रुमाल बांधला आहे. सलमानची ही पोस्ट पाहताच चाहत्यांनी त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. अनेकांनी सलमानला 'रिअल हिरो' असे म्हटले आहे. एका चाहत्याने लिहिले, "भाईजानचा स्वॅगच वेगळा आहे, पण हे त्याचे प्राण्यांवरील प्रेम मनाला भिडणारे आहे." तर दुसऱ्याने म्हटले, "प्रत्येक श्वानाला असाच प्रेमळ मालक मिळावा."
वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, सलमान खान सध्या त्याच्या आगामी 'बॅटल ऑफ गलवान' (Battle of Galwan) या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटासाठी त्याने स्वतःच्या फिटनेसवर खास मेहनत घेतली आहे. याशिवाय, 'बॅटल ऑफ गलवान'चे काम पूर्ण झाल्यानंतर तो त्याच्या सुपरहीट ठरलेल्या 'किक' चित्रपटाच्या सीक्वलवर, म्हणजेच 'किक-२' वर आपले लक्ष केंद्रित करणार आहे.