'सिंघम अगेन' मध्ये रणवीर सिंह-दीपिका पदुकोणचा रोमँटिक ट्रॅक का नाही? रोहित शेट्टी म्हणतो...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 14:50 IST2024-11-11T14:47:27+5:302024-11-11T14:50:28+5:30
रणवीर सिंहची सिनेमात भूमिका ही... रोहित शेट्टीचा खुलासा

'सिंघम अगेन' मध्ये रणवीर सिंह-दीपिका पदुकोणचा रोमँटिक ट्रॅक का नाही? रोहित शेट्टी म्हणतो...
रोहित शेट्टीचा (Rohit Shetty) 'सिंघम अगेन' (Singham Again) काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. सिनेमात अजय देवगण, करिना कपूर, रणवीर सिंह, दीपिका पदुकोण, अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, अर्जुन कपूर अशी तगडी कास्ट आहे. दरम्यान रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण हे नवरा बायको असूनही त्यांची सिनेमात जोडी नाही. ना त्यांच्यात कोणता रोमान्स आहे. याचं कारण नुकतंच रोहित शेट्टीने एका मुलाखतीत सांगितलं.
न्यूज १८ ला दिलेल्या मुलाखतीत रोहित शेट्टी म्हणाला, "सिंघम अगेन सिनेमात रामायणातील भूमिकांचा संदर्भ घेतला आहे. रणवीर सिंहच्या कॅरेक्टरला हनुमानाचा संदर्भ आहे. त्यामुळे रणवीर सिंहचा लव्ह अँगल सिनेमात घेतला असता तर धार्मिक भावना दुखावली जाण्याची शक्यता होती. गैरसमज झाला असता म्हणून आम्ही ते केले नाही."
दुसरीकडे सिनेमात रणवीर सिंह आणि अक्षय कुमारमध्ये मजेशीर संवाद दाखवण्यात आले आहेत. पण हेच रणवीर आणि दीपिकामध्ये न करण्याचा निर्णय जाणीवपूर्वक घेतला गेला. रोहित म्हणाला, "सिनेमा रामायण थीमवर घेतला असल्याने अनेक आव्हानं होती. आम्हाला याची पुरेपूर जाणीव होती. अॅक्शन सीक्वेन्सही सिनेमात तितकेच महत्वाचे होते त्यामुळे कोणाच्याही भावनांना ठेच पोहोचू नये याची काळजी घ्यायची होती. मला सिनेमा किती बिझनेस करेल ही काळजी नव्हती तर सिनेमावर कोणी आक्षेप घेणार नाही ना याची भीती होती. असं काही झालं नाही याचा आता आनंद आहे."