Rohit Shetty : १५ लाखांचं आमिष, ५० हजार एडव्हान्स; रोहितच्या घरावरील गोळीबाराच्या मास्टरमाइंडचा मास्टर प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 18:19 IST2026-02-19T18:18:33+5:302026-02-19T18:19:21+5:30

Rohit Shetty : चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात एक मोठा खुलासा झाला आहे.

Rohit Shetty house firing case accused deepak sharma shocking revelation that he was offered 15 lakh for it | Rohit Shetty : १५ लाखांचं आमिष, ५० हजार एडव्हान्स; रोहितच्या घरावरील गोळीबाराच्या मास्टरमाइंडचा मास्टर प्लॅन

Rohit Shetty : १५ लाखांचं आमिष, ५० हजार एडव्हान्स; रोहितच्या घरावरील गोळीबाराच्या मास्टरमाइंडचा मास्टर प्लॅन

चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात एक मोठा खुलासा झाला आहे. तपासादरम्यान समोर आलं आहे की, आरोपी दीपक शर्माला या गुन्ह्यासाठी १५ लाख रुपयांचं आमिष दाखवण्यात आलं होतं. फरार आरोपी शुभमने त्याला फक्त घराबाहेर गोळ्या झाडण्यास सांगितलं होतं. या कामासाठी ५० हजार रुपये एडव्हान्स म्हणून देण्यात आले होते. उर्वरित १४.५० लाख रुपये काम झाल्यानंतर देण्याचं ठरलं होतं, मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी दीपकला अटक केली.

चौकशीदरम्यान दीपक शर्माने कबुली दिली की, केवळ पैशांच्या हव्यासापोटी त्याने हे काम करण्यास होकार दिला होता. त्याने सांगितले की, त्याच्यावर सुमारे ८ लाख रुपयांचं कर्ज होतं आणि त्याला पैशांची नितांत गरज होती. याच अमिषापोटी तो या कटाचा भाग बनला. मिळालेल्या माहितीनुसार, ३१ जानेवारी रोजी रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील घराबाहेर पाच राऊंड फायरिंग करण्यात आली होती, ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. मुंबई क्राईम ब्रँचच्या तपासात असं समोर आलं आहे की, गोळीबारासाठी वापरलेली गाडी पुण्यातून आणली गेली होती.

सनी, सोनूने केली रेकी, दीपकने झाडल्या गोळ्या; रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबाराची इनसाईड स्टोरी

रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या शूटरला राजस्थानमधून अटक, क्राईम ब्रँचची मोठी कारवाई

ही गाडी सुरुवातीला पुण्यातील एका व्यक्तीची होती, ज्याने काही दिवसांपूर्वी ती ३० हजार रुपयांना आदित्य गायकवाड नावाच्या व्यक्तीला विकली होती. त्यानंतर आदित्य आणि समर्थ पोमाजी नावाच्या अन्य एका आरोपीने ही गाडी मुंबईत आणली आणि जुहू भागातील एका ठरलेल्या ठिकाणी सोडून ते निघून गेले. क्राईम ब्रँचच्या मते, गाडी खरेदी करणाऱ्या आणि ती मुंबईपर्यंत पोहोचवणाऱ्या लोकांना मूळ शूटरबद्दल कोणतीही माहिती नव्हती. नंतर शुभम लोणकर यानेच शूटरला फोन करून गाडी कुठे उभी आहे याची माहिती दिली होती.

ना लोकेशन, ना कॉलिंग... नवी मोडस ऑपरेंडी; रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार करणारे फरार

लॉरेन्स बिश्नोई गँगमधील हॅरी बॉक्सरकडून रणवीर सिंह, रोहित शेट्टीला धमकी; ऑडिओ व्हायरल

शूटरला त्याच ठिकाणाहून गाडी घेऊन रोहित शेट्टीच्या घराबाहेर गोळीबार करण्याचे निर्देश देण्यात आले होते. अशा प्रकारे संपूर्ण कट वेगवेगळ्या लोकांच्या माध्यमातून अंमलात आणण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणात बहादूरगडच्या एसटीएफ युनिटने मुंबई पोलिसांच्या मदतीने चार आरोपींना अटक केली आहे. यामध्ये आग्रा जिल्ह्यातील बहाबिजोली येथील रितिक यादव, नोएडा सेक्टर ४५ सादपूरचा दीपक आणि आग्रा येथील सनी व सोनू यांचा समावेश आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून एक फोन आणि एक गाडी जप्त केली आहे. सध्या पोलीस या संपूर्ण नेटवर्कची चौकशी करत असून फरार आरोपी शुभमचा शोध सुरू आहे.

Web Title : रोहित शेट्टी फायरिंग: ₹15 लाख का लालच, मास्टरमाइंड का विस्तृत प्लान उजागर।

Web Summary : रोहित शेट्टी के घर पर गोलीबारी मामले में ₹15 लाख का सौदा सामने आया। शूटर दीपक शर्मा को गोली चलाने के लिए ₹50,000 एडवांस मिले। इस्तेमाल की गई कार पुणे से थी। पुलिस ने चार को गिरफ्तार किया, शुभम की तलाश जारी है।

Web Title : Rohit Shetty Firing: ₹1.5 Million Promise, Mastermind's Detailed Plan Unveiled.

Web Summary : Rohit Shetty's house firing case reveals a ₹15 lakh deal for the crime. Shooter Deepak Sharma received ₹50,000 advance to fire shots. The car used was from Pune. Police arrested four, hunt for Shubham continues.