सुचित्रा सेनच्या भूमिकेत रितूपर्णा

By Admin | Updated: July 20, 2015 02:12 IST2015-07-20T02:12:12+5:302015-07-20T02:12:12+5:30

नवोदित चित्रपट निर्माता सैकत भकत याने खूप मोठे धाडस करायचे ठरवले आहे. बंगालीच नव्हे, तर भारतीय चित्रपटसृष्टीत मानाचे स्थान असलेल्या दिवंगत सुचित्रा सेन

Rituparna in the role of Suchitra Sen | सुचित्रा सेनच्या भूमिकेत रितूपर्णा

सुचित्रा सेनच्या भूमिकेत रितूपर्णा

नवोदित चित्रपट निर्माता सैकत भकत याने खूप मोठे धाडस करायचे ठरवले आहे. बंगालीच नव्हे, तर भारतीय चित्रपटसृष्टीत मानाचे स्थान असलेल्या दिवंगत सुचित्रा सेन हिच्या आयुष्यावर तो चित्रपट बनवतोय... ‘महानायिका’ हे त्याचे नाव! यात सुचित्राची भूमिका कोण करतेय माहीत आहे? हॉट अ‍ॅण्ड ग्लॅमरस रितूपर्णा सेनगुप्ताला हा जॅकपॉट लागलाय! या चित्रपटात रितूपर्णा साकारत असलेल्या पात्राचे नाव शकुंतला आहे. चित्रपटाबाबत बोलताना सैकत म्हणाला, ‘‘एका हीरोईनसाठी रिल आणि रिअल लाइफमध्ये समन्वय साधणे अवघड असते. मला विचाराल तर, सुचित्रासह मर्लिन मन्रो, सोफिया लॉरेन यांच्यासारख्या जागतिक दर्जाच्या अभिनेत्रींच्या जीवनातील निराशा, चिंता, उत्साह या भावनांचे काव्य म्हणजे हा चित्रपट आहे.’’ सशक्त अभिनय, निरागस डोळे ही प्रमुख ताकद असलेल्या सुचित्राचे मागील वर्षी निधन झाले.

Web Title: Rituparna in the role of Suchitra Sen