पाकिस्तानचा जावई होणार गायक-रॅपर बादशाह ? हानिया आमिरसोबत दुबईत झाला स्पॉट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 01:40 PM2024-04-22T13:40:31+5:302024-04-22T13:49:46+5:30

पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर आणि गायक आणि रॅपर बादशाहसोबतचे फोटो व्हायरल होत आहेत.

Rapper-singer Badshah recently hung out with Pakistani actor Hania Aamir in Dubai | पाकिस्तानचा जावई होणार गायक-रॅपर बादशाह ? हानिया आमिरसोबत दुबईत झाला स्पॉट

पाकिस्तानचा जावई होणार गायक-रॅपर बादशाह ? हानिया आमिरसोबत दुबईत झाला स्पॉट

हानिया आमिर एक लोकप्रिय पाकिस्तानी अभिनेत्री आहे. ती दररोज आपले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते आणि दररोज चर्चेत राहत असते. हानिया आणि बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक-रॅपर बादशाह हे एकमेंकाना डेट करत असल्याच्या अफवा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. यातच आता हानियानं बादशाहसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. यावरुन दोघेही डेट करत असल्याच्या अफवांना आणखीनच खतपाणी मिळालं आहे. 

हानिया आणि बादशाह हे दोघे दुबईमध्ये एकत्र एन्जॉय करताना दिसून आले आहेत. हानियानं दोन पोस्ट केल्या आहेत. एका पोस्टमध्ये तिनं फोटो बादशाहसोबतचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोला तिनं 'थेट चंदीगडहून बचाव आला आहे' असं कॅप्शन लिहलं आहे.

तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये  हानिया आणि बादशाह गाणी गाताना दिसत आहेत. या व्हिडीओला हानियानं 'कॉन्सर्ट टाइम' असं कॅप्शन दिलं आहे. यावर चाहत्यांनी भरभरुन कमेंट केल्या आहेत. 

पाकिस्तानी अभिनेत्री आणि बादशाह याआधीही एकत्र स्पॉट झाले होते. 1 डिसेंबर 2023 रोजी हानियाने बादशाहसोबतचे काही फोटो शेअर केले होते, त्यानंतर चाहत्यांनी डेटिंगची अटकळ बांधली होती. मात्र, या दोघांनीही या अफवांवर आतापर्यंत मौन बाळगले आहे. डेट करत असल्याची अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा त्यांनी केलेली नाही.  हानिया हिनं पाकिस्तानी चित्रपट व मालिकांमध्ये काम केलं. तिच्या सौंदर्यामुळे तिचे अनेक देशात फॅन्स आहेत.

Web Title: Rapper-singer Badshah recently hung out with Pakistani actor Hania Aamir in Dubai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.