'कल्कि'च्या सीक्वेलमध्ये दीपिका पादुकोणच्या जागी प्रियंका चोप्रा?, 'देसी गर्ल'नेही ठेवली 'ही' अट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 16:23 IST2025-12-06T16:22:32+5:302025-12-06T16:23:11+5:30
प्रियंका चोप्रा राजामौलींच्या आगामी 'वाराणसी' या दाक्षिणात्य सिनेमात दिसणार आहे. आता प्रियंकाला 'कल्की'च्या सीक्वेलची ऑफर मिळाली आहे.

'कल्कि'च्या सीक्वेलमध्ये दीपिका पादुकोणच्या जागी प्रियंका चोप्रा?, 'देसी गर्ल'नेही ठेवली 'ही' अट
'कल्कि 2898 एडी' सिनेमाच्या सीक्वेलमधून दीपिका पादुकोणचा पत्ता कट झाल्याचं सगळ्यांना माहितच आहे. दीपिकाने ८ तासांची शिफ्ट, मानधनात वाढ, प्रॉफिटमध्ये भाग अशा मागण्या ठेवल्याने तिला काढण्यात आलं. दरम्यान आता ग्लोबल स्टार प्रियंका चोप्रा दीपिकाची जागा घेणार असल्याची चर्चा आहे. त्यातच आता प्रियंकानेही एक अट ठेवली आहे. काय आहे ती अट?
प्रियंका चोप्रा आगामी 'वाराणसी' या दाक्षिणात्य सिनेमात दिसणार आहे. एस एस राजामौलींच्या या सिनेमात महेश बाबू आणि पृथ्वीराज सुकुमारन यांची भूमिका आहे. आता प्रियंकाला 'कल्की'च्या सीक्वेलची ऑफर मिळाली आहे. मात्र यासाठी प्रियंकाने अट ठेवली. बॉलिवूड हंगामा रिपोर्टनुसार, प्रियंकाने दीपिकाएवढंच मानधन मागितलं आहे. तसंच तिने शिफ्ट टायमिंगमध्ये फ्लेक्झिबिलिटीची मागणी केली आहे. कारण तिला लेक मालतीलाही वेळ द्यायचा आहे. असं असलं तरी प्रियंका लेकीला घेऊनच लोकेशनवर ट्रॅव्हल करण्यासाठी तयार आहे. त्यामुळे तेवढी अडचण येणार नाही. आता मेकर्स प्रियंकाची ही अट मान्य करतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
रिपोर्टनुसार, प्रियंका व्यतिरिक्त इतरही काही अभिनेत्रींच्या नावाचा विचार सुरु आहे. आलिया भट आणि साई पल्लवीचा यात समावेश आहे. सिनेमात प्रभास मुख्य भूमिकेत आहे. त्याच्यासारखीच स्टार पॉवर असणारी अभिनेत्री मेकर्सला हवी आहे.
'कल्की 2898 एडी'च्या सीक्वेलमधून दीपिका पादुकोणला काढल्याची अधिकृत घोषणा काही दिवसांपूर्वीच झाली होती. आता सिनेमात कोणाची एन्ट्री होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. तर दुसरीकडे दीपिका 'किंग' आणि अॅटलीच्या आगामी सिनेमत व्यग्र आहे.