प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 14:53 IST2025-04-29T14:53:15+5:302025-04-29T14:53:38+5:30

प्रीती झिंटा अभिनय क्षेत्र गाजवून लवकरच राजकारणात एन्ट्री करणार का, याविषयी तिला विचारलं असता प्रीतीने मनातील भावना व्यक्त केली (priety zinta)

Preity Zinta soon enter politics and BJP pm narendra modi actress answer revealed | प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."

प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."

प्रीती झिंटा (priety zinta) ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री. प्रीतीला आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय. प्रीती झिंटा सध्या पंजाब किंग्ज या IPL संघाची मालकीण आहे. प्रीतीचा IPL संघ यंदाच्या मौसमात चांगली कामगिरी करतोय. श्रेयस अय्यर PBKS संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळत आहे. अशातच प्रीतीने X वर चाहत्यांसोबत प्रश्न - उत्तरांचं एक सेशल केलं. यावेळी प्रीतीने एका चाहत्याने ती आगामी काळात भाजपमध्ये प्रवेश करुन राजकीय क्षेत्रात एन्ट्री करणार का? असं विचारलं असता ती काय म्हणाली बघा

प्रीती झिंटा भाजप प्रवेश करणार?

प्रीती झिंटाने X वर तिच्या चाहत्यांसोबत प्रश्न - उत्तरांचं एक सेशन केलं. त्यावेळा एका X यूजरने प्रीतीला विचारलं की, "तुम्ही येत्या काही दिवसांमध्ये भाजपमध्ये प्रवेश करणार आहात का? तुमचे गेल्या काही दिवसांचे ट्विट पाहून असंच वाटतंय." यावर उत्तर देताना प्रीती म्हणाली, "सोशल मीडिया यूजर्ससोबत हीच समस्या आहे की ते एखाद्या गोष्टीवरुन कोणा एका व्यक्तीबद्दल आडाखे बांधून त्याला जज करतात. मंदिर किंवा महाकुंभ जाणं ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. याचा अर्थ असा नाही की, मी राजकारणात किंवा भाजपमध्ये प्रवेश करेल."

प्रीती पुढे म्हणाली, "मी अनेक वर्ष भारताबाहेर राहिले आहे. त्यामुळे आता मला माझ्या देशाबद्दल अर्थात भारताबद्दल आणखी प्रेम निर्माण झालंय. भारत देशाचं खरं महत्व मला आता कळालंय. त्यामुळे भारताच्या गोष्टी आणि संस्कृतीबद्दल मला जास्त आदर निर्माण झाला आहे." अशाप्रकारे प्रीतीने ती राजकारणात प्रवेश करणार की नाही, याबद्दल मौन सोडलंय. प्रीतीने सध्या अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला असून ती सध्या IPL 2025 तिच्या पंजाब संघाला सपोर्ट करताना दिसतेय. प्रीती लवकरच 'क्रिश ४' सिनेमात झळकणार असल्याची चर्चा आहे.

 

Web Title: Preity Zinta soon enter politics and BJP pm narendra modi actress answer revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.