Palak Tiwari : "मी मॉमच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीसाठी तयार नव्हते"; श्वेताची लेक पलक तिवारीने स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 15:25 IST2025-01-06T15:11:19+5:302025-01-06T15:25:12+5:30

Palak Tiwari And Shweta Tiwari : श्वेता दुसऱ्यांदा प्रेग्नेंट होती तेव्हा पलक १५ वर्षांची होती.

पलक तिवारी ही श्वेता आणि राजा चौधरी यांची मुलगी आहे. २००० साली पलकचा जन्म झाला आणि २०१२ मध्ये तिचा आई-वडिलांचा घटस्फोट झाला.

श्वेता तिवारीने त्यानंतर २०१३ मध्ये अभिनेता अभिनव कोहलीसोबत दुसरं लग्न केलं. २०१६ मध्ये त्यांना मुलगा झाला, रेयांश असं त्यांच्या मुलाचं नाव आहे. मात्र २०१९ मध्ये त्यांचाही घटस्फोट झाला.

जेव्हा श्वेता दुसऱ्यांदा प्रेग्नेंट होती तेव्हा पलक १५ वर्षांची होती. जेव्हा तिच्या आईने तिला याबाबत सांगितलं तेव्हा ती या सर्व गोष्टींसाठी तयार नव्हती.

पलकने फिल्म कंपॅनियनलला दिलेल्या माहितीनुसार, "मी मॉमच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीसाठी तयार नव्हते. माझ्यामध्ये आणि आईमध्ये काहीतरी कॉन्ट्रॅक्ट होतं आणि ते तुटलं असं मला वाटलं."

जेव्हा श्वेता तिवारीने ती दुसऱ्यांदा आई होणार असल्याचं सांगितलं तेव्हा पलक खूप अस्वस्थ झाली होती.

पलकने या गोष्टीसाठी नकार दिला. त्यावर श्वेताला धक्काच बसला. तुझी ओव्हरएक्टिंग बंद कर असं तिने आपल्या लेकीला सांगितलं होतं.

श्वेता तिवारी सिंगल मदर आहे. ती एकटीच आता मुलगी पलक आणि मुलगा रेयांश यांचा सांभाळ करत आहे.

पलक आणि रेयांश यांच्या वयामध्ये १६ वर्षांचं अंतर आहे. पलक २४ वर्षांची आहे आणि रेयांश अवघ्या आठ वर्षांचा आहे.

श्वेता आणि पलक तिवारी दोघीही सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असून नेहमीच त्यांचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असतात.