Web Series Sequel 2023: नव्या वर्षात धमाका करणार या फेमस वेबसीरीजचे सीक्वल, फॅन्स बघण्यासाठी आतुर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 11:58 AM2022-12-27T11:58:40+5:302022-12-27T12:17:34+5:30

Welcome 2023: काही नवीन सीरीज रिलीज तर होणारच, सोबतच काही गाजलेल्या सीरीजचे सीक्वलही धमाका करणार आहेत. ज्यांची फॅन्स आतुरतेने वाट बघत आहेत.

Welcome 2023: 2022 हे वर्ष आता सरत आलं आहे आणि आता 2023 कडे लोकांचं लक्ष लागलं आहे. येणाऱ्या नव्या वर्षात ओटीटीवरही खूप काही खास होणार आहे. काही नवीन सीरीज रिलीज तर होणारच, सोबतच काही गाजलेल्या सीरीजचे सीक्वलही धमाका करणार आहेत. ज्यांची फॅन्स आतुरतेने वाट बघत आहेत.

The Family Man 3: मनोज वाजपेयीच्या 'द फॅमिली मॅन' सीरीजचे दोन सीझन आधीच रिलीज झाले आहेत. दोन्हीही सीझन जबरदस्त हिट ठरते. आता पुढील भागावर काम सुरू आहे. नक्कीच अपेक्षा आहे की, राज आणि डीकेची फेमस जोडी तिसरा सीझनही सुपरहिट करतील.

Mirzapur 3: भारतातील सगळ्यात जास्त गाजलेल्या सीरीजपैकी एक म्हणजे 'मिर्जापुर'. या सीरीजचेही दोन सीझन फार हिट ठरले. आता पुढील कहाणी जाणून घेण्यासाठी फॅन्स आतुर झाले आहेत. मिर्जापुरचा तिसरा सीझजन पुढील वर्षी नक्की रिलीज होणार आहे.

Paatal Lok 2: पाताल लोक जेव्हा रिलीज झाली होती तेव्हा सगळेच हैराण झाले होते. मर्डर मिस्ट्रीवरील या क्राइम सस्पेंस कहाणीने ओटीटीला एक वेगळी ओळख दिली. आता जयदीप अहलावत स्टारर या सीरीजचा पुढील भाग 2023 मध्ये रिलीज होणार आहे.

Yeh Kaali Kaali Aankhein 2: गेल्यावर्षी ये काली-काली आंखें सीरीज नेटफ्लिक्सवर आली होती. लोकांना ही सीरीज खूप आवडली होती. रोमॅंटिक मिस्ट्री ड्रामा असा काही गाजला की, आता लोक पुढील भागाची वाट बघत आहेत. पुढील भाग 2023 मध्ये रिलीज होणार आहे.

Aarya 3: सुष्मिता सेनने या सीरीजच्या माध्यमातून आपलं डिजिटल डेब्यू केलं होतं. ही सीरीज चांगलीच हिट ठरली. याचे दोन्ही सीझन लोकांना खूप आवडले. आता स्वत: डॉन बनलेल्या आर्याच्या आयुष्यात पुढे काय होतं हे लोकांना जाणून घ्यायचं आहे.