थरारक कथानक, अनपेक्षित ट्विस्ट; क्राईमच्या दुनियेतील ६ वेब सीरिज ज्या तुमच्या डोक्याचा करतील भुगा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 19:05 IST2025-09-01T19:01:30+5:302025-09-01T19:05:27+5:30
ओटीटी प्लॅटफॉर्मवर क्राईम आणि थ्रिलर जॉनर नेहमीच प्रेक्षकांची पहिली पसंती राहिली आहे. विशेष म्हणजे या क्राईम वेबसीरिजना आयएमडीबीवर प्रेक्षकांकडून उत्कृष्ट रेटिंग देखील मिळाले आहे. चला जाणून घेऊया अॅमेझॉन प्राइमवरील टॉप क्राईम वेब सिरीजबद्दल, ज्या तुम्हाला खिळवून ठेवतील.

ओटीटी प्लॅटफॉर्मवर क्राईम आणि थ्रिलर जॉनर नेहमीच प्रेक्षकांची पहिली पसंती राहिली आहे. विशेष म्हणजे या क्राईम वेबसीरिजना आयएमडीबीवर प्रेक्षकांकडून उत्कृष्ट रेटिंग देखील मिळाले आहे. चला जाणून घेऊया अॅमेझॉन प्राइमवरील टॉप क्राईम वेब सिरीजबद्दल, ज्या तुम्हाला खिळवून ठेवतील.
अॅमेझॉन प्राईम व्हिडीओच्या या क्राईम वेबसीरिज प्रत्येक अशा प्रेक्षकासाठी आहेत ज्यांना सस्पेन्स, थ्रिल आणि ड्रामा यांचे मिश्रण आवडते. 'मिर्झापूर'चा गँगस्टर ड्रामा असो किंवा 'द फॅमिली मॅन'चा हेरगिरीचा थरार, या सिरीज तुम्हाला तुमच्या जागेवर खिळवून ठेवतील. तर, तुमची आवडती सीरिज निवडा आणि या थरारक प्रवासात हरवून जा.
'मिर्झापूर' ही भारतीय क्राईम ड्रामाच्या दुनियेतील एक मैलाचा दगड मानली जाते. उत्तर प्रदेशातील मिर्झापूर शहरामध्ये सत्ता, गुन्हेगारी आणि कुटुंबाची कथा ही सीरिज मांडते. ज्यांना गँगस्टर ड्रामा आणि सत्तेसाठी चाललेल्या संघर्षाच्या कथा आवडतात त्यांच्यासाठी ही सीरिज एकदम योग्य आहे. 'मिर्झापूर'चे आतापर्यंत तीन सीझन आले आहेत आणि चौथा सीझन लवकरच प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. या सिरीजला आयएमडीबीवर ८.४ असे रेटिंग मिळाले आहे.
'द फॅमिली मॅन' ही एक स्पाय थ्रिलर सीरिज आहे. ही सीरिज श्रीकांत तिवारी (मनोज वाजपेयी) याची कथा सांगते, जो एक सामान्य मध्यमवर्गीय माणूस आहे आणि त्याचबरोबर राष्ट्रीय तपास संस्थेच्या काल्पनिक शाखाचा गुप्तहेर आहे. दहशतवादी हल्ले थांबवण्याचा प्रयत्न करताना त्याला आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. राज आणि डीके यांनी तयार केलेल्या या सीरिजमध्ये ॲक्शन, सस्पेन्स आणि हलक्या-फुलक्या विनोदाचे उत्तम मिश्रण आहे. 'द फॅमिली मॅन'चे दोन सीझन प्रदर्शित झाले आहेत आणि तिला आयएमडीबी (IMDb) वर ८.७असे रेटिंग मिळाले आहे.
'पाताल लोक' ही वेबसीरिज एका अपयशी ठरलेल्या हत्येच्या प्रयत्नाच्या चौकशीभोवती फिरणारी एक क्राईम थ्रिलर आहे. जयदीप अहलावत यांनी या सीरिजमध्ये 'इन्स्पेक्टर हाथीराम चौधरी'ची भूमिका साकारली आहे. हे प्रकरण सोडवण्याच्या प्रयत्नात तो गुन्हेगारीच्या अंधाऱ्या दुनियेत प्रवेश करतो. तरुण तेजपाल यांच्या कादंबरीवर आधारित या सीरिजचे कथानक आणि पात्रांचे सखोल चित्रण तिला एक उत्कृष्ट कलाकृती बनवते. या सीरिजला आयएमडीबी (IMDb) वर ८.२ असे रेटिंग मिळाले आहे.
'दहाड' ही सोनाक्षी सिन्हा अभिनीत पोलीस प्रोसीजरल थ्रिलर सीरिज आहे, जी राजस्थानमधील मंडावा या छोट्या गावात घडते. या सीरिजमधील कथानक, सस्पेन्स आणि सोनाक्षीचा दमदार अभिनय यामुळे ही सीरिज नक्कीच बघण्यासारखी आहे. ज्यांना गुन्हेगारी आणि न्याय यावर आधारित कथा आवडतात, त्यांच्यासाठी ही सीरिज योग्य आहे. 'दहाड'ला आयएमडीबी (IMDb) वर ७.६ असे रेटिंग मिळाले आहे.
'ब्रीद' ही २०१० मध्ये आलेली एक सायकोलॉजिकल थ्रिलर सिरीज आहे, जिला ८.२ असे रेटिंग मिळाले आहे. ही एका वडिलांची, डॅनीची (आर. माधवन) कथा आहे, जो आपल्या आजारी मुलाला वाचवण्यासाठी कोणत्याही थराला जायला तयार आहे. जेव्हा त्याला कळते की, त्याच्या मुलाला अवयव प्रत्यारोपणाची (ऑर्गन ट्रान्सप्लांट) गरज आहे, तेव्हा तो एक धोकादायक मार्ग निवडतो. ही सीरीज गुन्हा आणि नैतिकता यांच्यातील छोट्या छोट्या गोष्टीचं चित्रण करते.
राज आणि डीके दिग्दर्शित 'फर्जी' हा एक ब्लॅक कॉमेडी क्राइम थ्रिलर चित्रपट आहे जो सनी (शाहिद कपूर) ची कथा सांगतो. भारतातील आर्थिक असमानतेला कंटाळलेला एक अपयशी कलाकार सनी त्याचा मित्र फिरोजसोबत बनावट नोटा बनवण्याचा मार्ग स्वीकारतो. या धोकादायक खेळात, गँगस्टर मन्सूर (केके मेनन) आणि पोलिस अधिकारी मायकेल (विजय सेतुपती) त्यांचा पाठलाग करतात. शाहिद आणि विजयची उत्तम केमिस्ट्री आणि वेगवान कथा यामुळे तो पाहणे आवश्यक आहे. त्याचे आयएमडीबी रेटिंग ८.३ आहे.