'पंचायत'च्या कलाकारांनी केलं क्लासिक फोटोशूट, सचिवजी-रिंकीच्या रोमँटिक अदांनी वेधलं लक्ष

By देवेंद्र जाधव | Updated: July 4, 2025 15:46 IST2025-07-04T15:14:04+5:302025-07-04T15:46:46+5:30

काही दिवसांपूर्वीच 'पंचायत ४' वेबसीरिज रिलीज झाली. या वेबसीरिजमधील कलाकारांनी केलेलं खास फोटोशूट इंटरनेटवर व्हायरल झालंय

'पंचायत ४' वेबसीरिज काही दिवसांपूर्वी रिलीज झाली. या वेबसीरिजची सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चा आहे. 'पंचायत ४'च्या कलाकारांनी क्लासिक फोटोशूट केलंय

या फोटोत सचिवजी आणि विकास हे मॉडर्न अंदाजात दिसत आहेत. पिकलबॉल थीमवर आधारीत हे खास फोटोशूट आहे

'पंचायत ४'मधील मंजू देवी अर्थात अभिनेत्री नीना गुप्तांनी केस बांधत आणि फ्रॉक परिधान करत खास फोटोशूट केलंय.

या फोटोशूटमध्ये सर्वात जास्त लाइमलाइट लुटली आहे ती म्हणजे सचिवजी आणि रिंकीने. अभिनेता जितेंद्र कुमार आणि अभिनेत्री सान्विका यांचा रोमँटिक अंदाज सर्वांना आवडला आहे

'पंचायत ४'मधील रिंकी अर्थात अभिनेत्री सान्विका या फोटोशूटमध्ये ओळखताच येत नाहीय. सान्विकाने पिकलबॉल खेळत खास अंदाज दाखवला आहे.

'पंचायत ४'मधील बिनोद अर्थात अभिनेता अशोक पाठकने हातात फुलेराची पिशवी धरुन खास फोटो काढले आहेत. सीरिजमध्ये साधं शर्ट, पँटमध्ये वावरणारा अशोकचा हा स्टायलिश अंदाज सर्वांना पसंत पडतोय

देख रहा है बिनोद? असं म्हणत सचिवजींच्या नाकीनऊ आणणारा भूषणचा आधुनिक अवतार सर्वांचं लक्ष वेधून घेतोय. या सर्व फोटोंमध्ये प्रधान आणि प्रल्हादला सर्वजण मिस करत आहेत.