हलकेफुलके विषय ते मर्डर मिस्ट्री, नववर्षाच्या विकेंडला ओटीटीवर 'या' कंटेंटची मेजवानी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2024 12:31 PM2024-01-06T12:31:50+5:302024-01-06T12:42:27+5:30

ओटीटीवर आलाय भरमसाठ कंटेंट, नवीन वर्षाचा विकेंड 'फुल'

नवीन वर्ष 2024 चा पहिला विकेंड आला आहे. कंटेंटप्रेमींना ओटीटीवर वेबसिरीज, सिनेमांची मेजवानीच आहे. कोणकोणता नवीन कंटेंट रिलीज झाला आहे बघुया.

अमेझॉन प्राईमवर 'वेडिंग डॉट कॉन' ही डॉक्युमेंटरी रिलीज झाली आहे. सध्या अनेक वेडिंग अॅप आले आहेत ज्यावर जोडीदाराचा शोध घेतला जातो. या अॅपवरुन अनेकदा फसवणूकीच्या घटनाही घडल्या आहेत. त्यावरच ही डॉक्युमेंटरी आधारित आहे.

पंचायत फेम अभिनेता जितेंद्र कुमारचा 'ड्राय डे' हा सिनेमा रिलीज झाला आहे. यामध्ये त्याच्यासोबत मराठमोळी अभिनेत्री श्रिया पिळगावकर आहे. पतीचं दारुचं व्यसन सोडवण्यासाठी पत्नी गर्भपाताची धमकी देते अशी त्याची कहाणी आहे. अमेझॉन प्राईमवर हा सिनेमा रिलीज झाला आहे.

इंग्रजी कंटेंट पाहणाऱ्यांमध्ये अनेकांनी 'मनी हाईस्ट' ही गाजलेली वेबसिरीज पाहिली असेलच. याच सीरिजची प्रिक्वल सीरिज 'बर्लिन' रिलीज झाली आहे. ती तुम्ही या विकेंडला ओटीटीवर पाहू शकता. आंद्रेसोबत चोरीच्या आधी होणाऱ्या घटना यामध्ये दाखवण्यात आल्या आहेत.

साऊथ कंटेंट पाहणाऱ्यांसाठी एक हलकाफुलका सिनेमा ओटीटीवर आला आहे ज्याचं नाव 'हाय नॅना' आहे. अभिनेता नानी आणि मृणाल ठाकूर अभिनीत हा फॅमिली ड्रामा आहे. रोमान्स आणि कौटुंबिक गोष्टींवर सिनेमाची कहाणी आधारित आहे. नेटफ्लिक्सवर तुम्ही हा सिनेमा पाहू शकता.

यासोबतच नेटफ्लिक्सवर दोन आठवड्यांपूर्वीच एक सिनेमा आला आहे. 'सजनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ' याची खूपच चर्चा आहे. राधिका मदन, निम्रत कौर, सुबोध भावे यांची सिनेमात भूमिका आहे. शाळेतील शिक्षिका आत्महत्या करते ज्याला मुख्याध्यापक जबाबदार असतो अशा विषयावर सिनेमाची कहाणी आधारित आहे.

'मायनस 31: द नागपूर फाइल्स' हा सिनेमाही सध्या चर्चेत आहे. कोव्हिड काळात सिस्टीममधील ऑफिसरचे डार्क वास्तव उघड पाडणारी ही सिरीज आहे. त्यातही इन्व्हेस्टिगेटिव्ह मर्डर मिस्ट्री दाखवण्यात आली आहे. प्राईमवर तु्म्ही हा सिनेमा पाहू शकता.

नीना गुप्ता आणि जॅकी श्रॉफ यांचा 'मस्त मे रहने का' हा सिनेमाही अगदी हलकाफुलका आहे. अमेझॉन प्राईमवर हा सिनेमा रिलीज झाला आहे. एकटे राहणाऱ्या वयस्कर माणसांच्या आयुष्यात काय काय सुरु असतं त्यातच एकाच्या घरी चोरी होते तेव्हा काय घडतं अशी सिनेमाची मजेशीर कथा आहे.

'शास्त्री विरुद्ध शास्त्री' हा सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. सात वर्षांचा मुलगा जो त्याच्या आजी आजोबांसोबत राहत असतो आणि त्याचे आईवडील विकेंडला त्याला भेटायला येत असतात. हा मुलगा कशाप्रकारे त्याच्या कुटुंबाला एकत्रित आणतो यावर सिनेमाची कथा आधारित आहे.