नवीन वर्षात OTT वर सिक्वेलचा धुमाकूळ, चौथ्या सीरिजची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 11:42 AM2024-01-04T11:42:42+5:302024-01-04T11:56:26+5:30

तुम्ही कोणत्या वेबसीरिजसाठी उत्सुक आहात?

OTT Webseries 2024: नवीन वर्षाचं धुमधडाक्यात स्वागत झालं आहे. सोबतच ओटीटीवर अनेक लोकप्रिय सिरीज रिलीज होणार आहेत. यापैकी काही सिरीजच्या सिक्वलची प्रतिक्षा आहे. 'मिर्झापूर 3' ते 'पंचायत 3' सह अनेक वेबसिरीजचा यामध्ये समावेश आहे.

मिर्झापूर 3(Mirzapur 3): 2024 मध्ये रिलीज होणाऱ्या वेबसिरीजमध्ये पहिलं नाव येतं ते मिर्झापूर 3 चं. सिरीजचे पहिले दोन्ही सीझन प्रचंड गाजले. त्यामुळे आता तिसऱ्या भागाचीही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. पंकज त्रिपाठी म्हणजेच कालीन भैय्या या भागात मुलाच्या मृत्यूचा बदला घेऊ शकतात. तर दुसरीकडे बीनानेही सत्यानंद त्रिपाठी यांची हत्या केल्याचं कालीन भैय्यासमोर उघड होणार आहे. त्यामुळे हा सिझन नक्कीच इंटरेस्टिंग असणार आहे.

पंचायत 3 (Panchayat 3): पंचायत वेबसिरीजचा कोणी चाहता नाही असं होणंच शक्य नाही. फुलेरा गावाची हलकी फुलकी कहाणी यामध्ये दाखवण्यात आली आहे. याही सिरीजचे पहिले दोन भाग सुपरहिट झाले. तिसऱ्या भागात सचिवजी अभिषेक त्रिपाठी फुलेरा गाव सोडून जाणार का हे उघड होणार आहे. आमदाराशी पंगा घेतल्याने सचिवजीवर गाव सोडायची वेळ आल्याचं दुसऱ्या भागाच्या शेवटी समजलं होतं. आता पुढे नेमकं काय होणार हे या भागात कळणार आहे.

गेल्या वर्षी शाहीद कपूरने 'फर्जी' (Farzi) या वेबसिरीजमधून ओटीटीवर पदार्पण केलं होतं. बनावट नोटा छापण्याच्या संकल्पनेवर सिरीज आधारित होती. याचाही शेवट खूपच इंटरेस्टिंग झाला होता. आता दुसऱ्या भागाची प्रेक्षकांना प्रतिक्षा आहे. यावर्षात 'फर्जी 2' रिलीज होण्याची शक्यता आहे.

कोरोना काळात एका वेबसिरीजने प्रेक्षकांवर छाप पाडली होती ती म्हणजे 'पाताल लोक'(Paatal Lok 2) . यावर्षात 'पाताल लोक'चा दुसरा भाग येणार अशी चर्चा आहे. सिरीजमध्ये जयदीप अहलावत पोलिस अधिकारी असून अभिषेक बॅनर्जी किलर हथौडा त्याही त्यागीच्या भूमिकेत आहे.

द फॅमिली मॅन 3 (The Family Man 3): बॉलिवूडचे प्रभावशाली अभिनेते मनोज वायपेयी यांनी 'फॅमिली मॅन' वेबसिरीजमधून वेगळीच छाप सोडली. पहिल्या दोन्ही सिझनला प्रेक्षकांना प्रतिसाद दिला. दुसरा सिझन जिथे संपला त्यावरुन तिसरा येणार हे तर स्पष्ट झालेच होते. आता यावर्षी तिसरा भाग रिलीज होतो का याकडे चाहते वाट पाहून आहेत.

आश्रम 4 (Ashram 4): बॉबी देओल सध्या Animal सिनेमामुळे चांगलाच चर्चेत आहे. त्याचं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन थक्क करणारे आहे. पण बॉबी खरंतर याआधीच आश्रम सिरीजमुळे प्रकाशझोतात आला होता. यामध्ये त्याने साकारलेली निराला बाबाची भूमिका प्रेक्षकांना आवडली. आता सिरीजच्या चौथ्या सीझनची प्रतिक्षा आहे.

एक्शन थ्रिलर वेबसिरीज 'सांस बहू और फ्लेमिंगो'(Saans Bahu aur Flamingo) च्याही दुसऱ्या पार्टची चर्चा आहे. डिंपल कपाडिया यांनी या सिरीजमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकलं. यावर्षी सिरीजचा दुसरा भाग प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.