विशाखा सुभेदार यांचे पतीही आहेत अभिनेते, 'या' लोकप्रिय नाटकात करत आहेत काम
By देवेंद्र जाधव | Updated: May 7, 2025 18:01 IST2025-05-07T17:42:10+5:302025-05-07T18:01:30+5:30
विशाखा सुभेदार यांचे पतीही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांना आपण नवरा माझा नवसाचा या सुपरहिट सिनेमात अभिनय करताना पाहिलंय

सध्या मराठी रंगभूमीवर 'मी vs मी' नाटकाची खूप चर्चा आहे. या नाटकात अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचे पती काम करत आहेत.
विशाखा सुभेदार यांच्या पतीचं नाव आहे महेश सुभेदार. महेश सुद्धा लोकप्रिय अभिनेते असून ते गेली अनेक वर्ष मनोरंजन विश्वात कार्यरत आहेत.
महेश सुभेदार आणि विशाखा सुभेदार या दोघांचा एकमेकांच्या करिअरला कायम सपोर्ट असतो. दोघांचे अनेक रोमँटिक फोटोही सोशल मीडियावर दिसतात.
महेश आणि विशाखा यांना एक मुलगाही आहे. विशाखा आणि महेश यांचा मुलगा सध्या लंडनला पुढील शिक्षण घेत आहे
महेश आणि विशाखा या दोघांच्या जोडीवर चाहते प्रेम करताना दिसतात. महेश सुभेदार 'मी vs मी' नाटकाच्या माध्यमातून सध्या अभिनय करताना दिसत आहेत
महेश सुभेदार यांना आपण 'नवरा माझा नवसाचा', 'ही पोरगी कोणाची', 'लगी तो छगी' सिनेमात अभिनय करताना पाहिलंय.
एकमेकांच्या करिअरला साथ देणारे, एकमेकांसाठी तडजोड करणारे कपल्स मनोरंजन विश्वात सापडणं म्हणजे दुर्मिळ गोष्ट. पण महेश आणि सुभेदार हे असंच आदर्श कपल आहे.