'तारक मेहता'फेम बागाची गर्लफ्रेंड बावरी अचानक झाली मालिकेतून गायब; आता जगतीये ग्लॅमरस लाइफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 15:36 IST2022-02-18T15:33:34+5:302022-02-18T15:36:53+5:30

Taarak mehta ka ooltah chashmah: या मालिकेत बावरीची भूमिका अभिनेत्री मोनिका भदौरिया हिने साकारली होती. मात्र, आता मोनिका या मालिकेत दिसेनाशी झाली आहे.

छोट्या पडद्यावर तुफान गाजत असलेली मालिका म्हणजे तारक मेहता का उल्टा चश्मा.

या मालिकेतील प्रत्येक कलाकार आज प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. त्यामुळे हे कलाकार प्रत्येकालाच आपल्या घरातील सदस्यांप्रमाणे भासतात.

गेल्या कित्येक दिवसांपासून या मालिकेत दयाबेन दिसत नसल्यामुळे प्रेक्षक थोडेसे नाराज आहेत. मात्र, दयाबेनप्रमाणेच या मालिकेतील आणखी एक अभिनेत्री गेल्या काही वर्षांमध्ये मालिकेत झळकली नाही.

तुम्हाल बागाची गर्लफ्रेंड बावरी आठवते का? ही बावरी गेल्या काही वर्षांपासून मालिकेत जराही झळकली नाहीये. त्यामुळे सध्या ती काय करते. कुठे असते असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांना पडतात.

या मालिकेत बावरीची भूमिका अभिनेत्री मोनिका भदौरिया हिने साकारली होती. मात्र, आता मोनिका या मालिकेत दिसेनाशी झाली आहे.

गेल्या काही वर्षांपूर्वीच मोनिकाने ही मालिका सोडली आहे. मात्र,तरीदेखील तिची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगत असते.

काही वैयक्तिक कारणांमुळे मोनिकाने ही मालिका सोडली. मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून ती कायम नेटकऱ्यांच्या भेटीला येत असते.

मोनिकामध्ये सध्या कमालीचा बदल झाला असून ती प्रचंड ग्लॅमरस दिसते.