मराठमोळी अभिनेत्री बोल्ड सीनमुळे आली होती चर्चेत, सिनेइंडस्ट्रीला केला रामराम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 05:26 PM2024-02-05T17:26:10+5:302024-02-05T17:30:49+5:30

मराठमोळ्या या अभिनेत्रीने स्वतःच्या हिमतीवर बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं होतं. आता ती कलाविश्वातून का गायब आहे आणि सध्या करतेय आहे, ते जाणून घेऊयात.

टार्झन गर्ल आणि जुम्मा चुम्मा गर्ल म्हणून प्रसिद्ध झालेल्या अभिनेत्री किमी काटकर सध्या सिनेइंडस्ट्रीपासून दूर आहेत. त्यांनी अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केलेले आहे. बऱ्याच सिनेमात त्या झळकल्या आहेत.

किमी काटकर यांनी स्वतःच्या हिमतीवर बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं होतं. आता त्या कलाविश्वातून का गायब आहे आणि सध्या करताहेत, ते जाणून घेऊयात.

किमी काटकर यांचं खरं नाव नयनतारा काटकर आहे. त्यांनी १९८५ साली पत्थर दिल चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यात त्या सहाय्यक भूमिकेत दिसल्या होत्या. हा चित्रपट फ्लॉप ठरला. मात्र जेव्हा त्यांना त्याच वर्षी अॅडव्हेंचर्स ऑफ टार्जन सिनेमात मुख्य भूमिका मिळाली. त्यात त्या हेमंत बिर्जेंसोबत दिसल्या होत्या. या चित्रपटामुळे त्यांचे नशीब फळफळलं.

किमी काटकर यांनी जवळपास ५० सिनेमात काम केले होते आणि १९८९ पर्यंत त्यांचे १५ चित्रपट रिलीज झाले होते. त्यांनी जितेंद्र, धर्मेंद्र, शत्रुघ्न सिन्हा, विनोद खन्ना, ऋषी कपूर आणि अनिल कपूर यांच्यासारख्या कलाकारांसोबत काम केले होते. किमी काटकर १९९१ साली अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'हम' सिनेमात जुम्मा चुम्मा गाण्यावर थिरकल्या. हे गाणे लोकप्रिय झाले आणि त्या लोकप्रिय झाल्या.

किमी काटकर १९९१ साली अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'हम' सिनेमात जुम्मा चुम्मा गाण्यावर थिरकल्या. हे गाणे लोकप्रिय झाले आणि त्या लोकप्रिय झाल्या.

१९९२ साली किमी काटकर यांनी फोटोग्राफर शांतनु शौरी यांच्यासोबत लग्न केले आणि लग्नानंतर त्या बॉलिवूडमधून गायब झाल्या आहेत.

लग्नानंतर त्या परदेशात स्थायिक झाल्या. कित्येक वर्ष तिथे राहिल्यानंतर त्या भारतात परतल्या आणि गोव्यात राहू लागल्या. आता फॅमिलीसोबत आपला टाईम स्पेंड करत आहेत.

त्यांना एक मुलगा आहे, ज्याचं नाव सिद्धांत आहे. सगळं काही सुरळीत चालू असताना त्यांना समजले की, ९ वर्षांच्या मुलाला पोटाचा कॅन्सर आहे. त्याच्या उपचारासाठी त्या मेलबर्नला गेल्या आणि पाच वर्षांनंतर भारतात परतल्या आहेत.

द अॅडव्हेंचर्स ऑफ टार्झनच्या शूटिंगवेळी किमी यांना छोटे कपडे परिधान करायचे होते. मात्र कॉन्ट्रॅक्टमुळे त्या काहीच करु शकल्या नाहीत. शूटिंगवेळी त्यांना एक ड्रेस दिला होता, ज्यात त्यांना इनरवेअर परिधान करून पूलमध्ये उतरायचे होते. मात्र शूटवेळी त्यांचा ड्रेस स्लीप झाला आणि मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांना कॅमेऱ्यासमोर न्यूड कॅप्चर करण्यात आले. हा सीन हटवण्यासाठी त्यांनी आणि त्यांच्या आईने दिग्दर्शकाला खूप विनंती केली. तरीही दिग्दर्शकाने सीन रिलीज केला. त्यामुळे खळबळ माजली होती.

२००९ साली किमी काटकर यांनी मुलाखतीत सांगितले होते की, मला वाटते की मी योग्य वेळी इंडस्ट्री सोडली.