Gaurav More Wife: गौरव मोरेच्या बायकोचं मनोरंजन विश्वाशी खास कनेक्शन! थेट बॉलिवूडमध्ये केलंय काम
By देवेंद्र जाधव | Updated: April 6, 2026 08:58 IST2026-04-06T08:47:34+5:302026-04-06T08:58:05+5:30
५ एप्रिलला सर्वांना आनंदाची बातमी कळाली. कारण गौरव मोरेच्या लग्नाची बातमी समोर आली. गौरवच्या पत्नीचं मनोरंजन विश्वाशी खास कनेक्शन आहे. जाणून घ्या

५ एप्रिलला सर्वांना आनंदाची बातमी कळाली. कारण गौरव मोरेच्या लग्नाची बातमी समोर आली. कॉमेडी शो गाजवणाऱ्या गौरवने गुपचुप लग्न करुन चाहत्यांना सुखद धक्का दिला. गौरवच्या पत्नीचं मनोरंजन विश्वाशी खास कनेक्शन आहे.

गौरव मोरेच्या बायकोचं नाव आहे प्रियंका कारेकर. गौरव आणि प्रियंका अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये जरी असले तरी त्यांनी नात्याचा जाहीर खुलासा केला नव्हता.

गौरवची बायको प्रियंकाही अभिनेत्री आहे. प्रियंका गेल्या काही वर्षांपासून मनोरंजन विश्वात सक्रीय आहे. प्रियंकाने बॉलिवूड सिनेमांमध्येही काम केलंय.

प्रिंयकाने प्रसिद्ध दिग्दर्शक आर. बाल्की यांच्यासह 'चूप' या बॉलिवूड सिनेमात काम केलं आहे. या सिनेमात सनी देओल आणि डुलकीर सलमान प्रमुख भूमिकेत होते. प्रियंंकाने बाल्कींसोबतचा फोटोही पोस्ट केला होता.

प्रियंकाचं महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमधील कलाकारांशी खास नातंही आहे. गौरव जेव्हा हास्यजत्रेत काम करत होता तेव्हा प्रियंकाही शोमधील अभिनेत्रींसोबत फोटो पोस्ट करायची. त्यामुळे हास्यजत्रेतील कलाकारांचीही प्रियंकासोबत चांगली मैत्री आहे.

गौरवच्या करिअरमध्ये प्रियंकाचा त्याला सपोर्ट आहे. शून्यापासून सुरुवात केलेला गौरव मोरे आज यशाच्या शिखरावर आहे. गौरवच्या या संपूर्ण प्रवासात प्रियंकाची त्याला साथ आहे.

प्रियंका आणि गौरवने काल नवीन घरात प्रवेश केला. फिल्डरपाड्याचा बच्चन नावाने प्रसिद्ध असलेल्या गौरवने पवई भागात नवीन घर खरेदी करुन आणि लग्न करुन आयुष्याचीही नवी सुरुवात केलीये

















