"मी तिसर्‍यांदा लग्न करावं की नाही..", श्वेता तिवारीनं वैवाहिक आयुष्याबाबत केला होता खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 01:01 PM2023-05-23T13:01:48+5:302023-05-23T19:05:40+5:30

श्वेता तिवारीचं वैवाहिक आयुष्य कायम चर्चेत राहिले. अभिनेत्रीचा दोनदा घटस्फोट झाला.

श्वेता तिवारीला कोणत्याही परिचयाची गरज नाही. 'कसौटी जिंदगी की', 'कुमकुम' आणि 'क्यूंकी सास भी कभी बहू थी' यांसारख्या टीव्ही शोद्वारे ती घराघरात आपली ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरली आहे, पण तिचे वैयक्तिक आयुष्यात अनेक अडचणींनी भरलेला राहिले. (फोटो इन्स्टाग्राम)

तिने दोन लग्न केली खरी, पण यातलं एकही यशस्वी झाले नाही. यावरुन तिला शेजारून अनेक टोमणे ऐकायला मिळाले, पण आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर तिने हार मानली नाही आणि सर्व अडचणींचा खंबीरपणे सामना केला.(फोटो इन्स्टाग्राम)

श्वेताने बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलेपणाने बोलली होती. (फोटो इन्स्टाग्राम)

श्वेता म्हणाली होती, 'तुम्ही 10 वर्षे लिव्ह-इनमध्ये, त्यानंतर पुन्हा 10 वर्षे दुसऱ्यासोबत लिव्ह-इनमध्ये राहा, त्याबद्दल कोणी काही बोलत नाही, पण तुमची दोन लग्न अयशस्वी ठरली तर लोक म्हणतील किती लग्न करणार ही?, लोक मला येऊन मला सांगतात की तिसरं लग्न करू नकोस.' (फोटो इन्स्टाग्राम)

'आता मी तुम्हाला विचारुन करु का?, आणि मी तिसर्‍यांदा लग्न करावं की नाही हे सांगणारे तुम्ही कोण? हा माझा निर्णय आहे.'(फोटो इन्स्टाग्राम)

ती पुढे म्हणाले की, 'मला तिसरे लग्न करायचे आहे की नाही, मला संन्यास घ्यायचा आहे की हिमालयात जाऊन बसायचे आहे याचा विचार मी करेन. लोक येऊन सांगतात की तू २ लग्न केलीस, तुझी मुलगी पाच लग्न करेल. कुणाला माहिती कदाचित ती लग्न करणारच नाही. तिने जे काही पाहिलं आहे त्यानंतर कदाचित ती आयुष्यात चांगल्या मुलाची निवड करेल. (फोटो इन्स्टाग्राम)

श्वेता पुढे म्हणाली, 'मी एक गोष्ट सांगतो की, इथे खूप चांगल्या कुटुंबातील लोक राहतात, जे शिकलेले आहेत, पण जेव्हा त्यांना कळले की मी दुसरं लग्न करणार आहे, तेव्हा इथल्या अर्ध्या लोकांनी माझ्याशी बोलणं बंद केलं, माझ्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली. (फोटो इन्स्टाग्राम)

ती हे देखील म्हणाली होती की, 'माझ्या बिल्डिंगमधून बरेच लोक येतात आणि मुलांना विचारतात, वडील घरी येतात का?, तुम्ही वडिलांना भेटता का?(फोटो इन्स्टाग्राम)

तर दुसरीकडे दोन मुलांना एकटीने वाढवताना याच लोकांनी म्हटलं काहीही अडचण नाही, जेव्हा तू इतकं पैसे कमावतेस तुझं बिल भरु शकतेस, मुलांचं बिल भर, तुझी खरेदी कर आणि मुलांची सुद्धा... स्वत:साठी जेवण खरेदी करा. तसेच इतरांसाठी ही खरेदी करा आणि दोन चार मित्रांसाठी देखील खरेदी करा.. मग तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.(फोटो इन्स्टाग्राम)