कोण आहेत चिंकी-मिंकी? जाणून घ्या कलाविश्वात धुमाकूळ घालणाऱ्या जुळ्या बहिणींची खरी नावं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 15:23 IST2022-01-20T15:20:06+5:302022-01-20T15:23:38+5:30

Chinki Minki: 'द कपिल शर्मा' या शोमध्ये आल्यानंतर चिंकी-मिंकी खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आल्या. इतकंच नाही तर त्याची लोकप्रियता झपाट्याने वाढली.

चिंकी-मिंकी (Chinky Minky) या जुळ्या बहिणींना आज कोणी ओळखत नाही असं म्हणणारे फार क्वचितच असतील. इंटरनेटवर सध्या या बहिणी धुमाकूळ घालत आहेत.

'द कपिल शर्मा' या शोमध्ये आल्यानंतर चिंकी-मिंकी खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आल्या. इतकंच नाही तर त्याची लोकप्रियता झपाट्याने वाढली.

टिकटॉक स्टार ते सेलिब्रिटी असा प्रवास करणाऱ्या चिंकी -मिंकी नेमक्या आहेत तरी कोण ते जाणून घेऊयात.

सध्या चिंकी-मिंकी सोशल मीडिया सेन्शन आहेत. त्यांचा कोणत्याही व्हिडीओ क्षणार्थात वाऱ्यासारखा व्हायरल होतो.

टिकटॉकपासून सुरुवात करणाऱ्या या दोन बहिणींनी कलाविश्वात त्यांचं स्थान निर्माण केलं आहे.

चिंकी आणि मिंकी या दोघींचं खरं नाव सुरभ‍ी मेहरा (Surabhi Mehra) आणि समृद्ध‍ी मेहरा (Samriddhi Mehra) आहे. परंतु, त्यांची ही खरी नावं फार कमी जणांना माहित आहेत.

२७ डिसेंबर १९९८ मध्ये या दोघींचा जन्म नोएडामध्ये झाला.

चिंकी-मिंकीचं एक युट्यूब चॅनेल आहे. या चॅनेलच्या माध्यमातून आता त्या अनेक सेलिब्रिटींचे इंटरव्ह्यूज घेत असतात. तसंच स्वत:चे काही व्हिडीओ कंटेन्टही शेअर करतात.