ठरलं बाबा एकदाचं! 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीचे हळदी समारंभाचे फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 10:03 IST2025-09-10T09:59:25+5:302025-09-10T10:03:12+5:30

'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीचे हळदी समारंभाचे फोटो व्हायरल झाले आहेत. अभिनेत्रीने स्वत: हे फोटो शेअर केले आहेत.

'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीचे हळदी समारंभाचे फोटो व्हायरल झाले आहेत. अभिनेत्रीने स्वत: हे फोटो शेअर केले आहेत.

अभिनेत्रीचे हळदीचे फोटो पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. फोटोत दिसणारी ही अभिनेत्री म्हणजे 'बिग बॉस मराठी' फेम रुचिरा जाधव आहे.

रुचिराने तिच्या इन्स्टाग्रामवरुन हळदी समारंभाचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिने पिवळ्या रंगाचा लेहेंगा परिधान करत खास लूक केल्याचं दिसत आहे.

"में क़ैद हु…तेरे भी प्यार में तब से...", असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.

रुचिरा या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. "लग्न करतेस की काय...", "ठरलं बाबा एकदाचं", "तुझं लग्न आहे का?" अशा कमेंटही केल्या आहेत.

पण, रुचिरा खऱ्या आयुष्यात लग्न करत नाहीये. तर मालिकेत तिचं लग्न होत आहे.

रुचिरा 'तू ही रे माझा मितवा' मालिकेत लावण्या ही भूमिका साकारत आहे. लावण्या आणि अर्णवची मालिकेत लगीनघाई सुरू असल्याचं दिसत आहे.

मालिकेच्या सेटवरील फोटो रुचिराने शेअर केले आहेत. पण 'तू ही रे माझा मितवा' मालिकेत खरंच लावण्या आणि अर्णवचं लग्न होणार का? हे पाहणं रंजनकारक असणार आहे.