tejasswi Prakash : टीव्हीवरची टॉप अभिनेत्री आहे तेजस्वी, पण मिळत नाही चित्रपट; ऑडिशनमध्ये झाली रिजेक्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 18:27 IST2025-01-31T18:06:00+5:302025-01-31T18:27:54+5:30

tejasswi Prakash : टीव्ही इंडस्ट्रीचा एक मोठा चेहरा असलेल्या तेजस्वी प्रकाशला आता चित्रपटांमध्ये रस आहे.

टीव्ही इंडस्ट्रीचा एक मोठा चेहरा असलेल्या तेजस्वी प्रकाशला आता चित्रपटांमध्ये रस आहे. टीव्हीवरून चित्रपटांकडे वळल्याचं तिने म्हटलं आहे.

तेजस्वीसाठी हे करणं फार सोपं नव्हतं. काही वर्षे टीव्ही इंडस्ट्रीपासून ब्रेक घेतल्यानंतर तिला एक मराठी चित्रपट मिळाला. पण हिंदी चित्रपट अजूनपर्यंत मिळालेला नाही.

पिंकव्हिलाशी बोलताना तेजस्वी म्हणाली, "टीव्ही कलाकार चित्रपटांसाठी ओव्हर एक्सपोज्ड असतात. मी दोन चित्रपट केले आणि निर्मात्यांना माझ्यासोबत काम करण्यास रस होता असं दिसून आलं.

"पण हो, मी अशा काही ऑडिशन दिल्या आहेत जिथे मला रिजेक्शन मिळालं आहे कारण मी ओव्हर एक्सपोज्ड आहे."

"ते मला असं लॉजिक देत होते की, तुला आधीच इतकं पाहिलं आहे, मग लोक आता तुला चित्रपटात का पाहतील?"

"मला हे लॉजिकच पटलं नाही. इतके टीव्ही कलाकार चित्रपट करत आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्मवर काम करत आहेत. मला त्यांचं हे विधान विचित्र वाटलं."

"जर मी स्क्रिनवर दिसते तर याचा अर्थ लोकांना मला पाहायचं आहे.पण मला असंही वाटतं की निर्मात्यांचा दृष्टिकोन काही गोष्टींमध्ये हळूहळू पण निश्चितच बदलत आहे."

तेजस्वी प्रकाश सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असून ती नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.