५०० साड्या, ५० किलो दागिने आणि चांदीची भांडी घेऊन बिग बॉसच्या घरात पोहोचली 'ती'
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 14:48 IST2025-08-29T14:10:46+5:302025-08-29T14:48:45+5:30
Tanya Mittal : बिग बॉसच्या घरात किती साड्या आणल्या आहेत हे समजल्यावर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला आहे.

तान्या मित्तल ही बिग बॉस १९ ची स्पर्धक आहे, जी सोशल मीडियावर सर्वाधिक लोकप्रिय आहे. मात्र सध्या तान्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
अभिनेत्री तिची व्हीआयपी लाईफस्टाईल दाखवण्याची एकही संधी सोडत नाही. ती शोमध्ये साड्या परिधान करून तिचा भारतीय लूक दाखवत आहे.
तान्याने बिग बॉसच्या घरात किती साड्या आणल्या आहेत हे समजल्यावर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला आहे. प्रीमियर एपिसोडमध्ये तान्याने स्वतः याबाबत खुलासा केला.
तान्याने सांगितलं होतं की, ती ५०० हून अधिक कस्टमाइज्ड साड्या घेऊन घरात आली आहे. ५० किलोच्या दागिन्यांसह, तिने चांदीची भांडी आणि बॉटल आणली आहे.
तान्या ही एकमेव स्पर्धक आहे जिला बिग बॉसच्या घरात स्वतःची भांडी आणण्याची परवानगी देण्यात आली आहे. तान्या स्वतःला स्पिरिच्युअल इन्फ्लुएन्सर म्हणते.
या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून बाहेर काढण्यासाठी तान्याला नॉमिनेट करण्यात आलं आहे. घरातील सदस्यांचा असा विश्वास आहे की, ती शोमध्ये तिची रियल पर्सनॅलिटी दाखवत नाही.
लोक तिला फेक म्हणत आहेत. तिचे अशनूर कौरशी भांडण झालं आहे. तिला तिच्या फेकपणामुळे सोशल मीडियावर खूप ट्रोल केलं जात आहेत.
बिग बॉस १९ मध्ये या आठवड्यात घराबाहेर पडण्याबाबत जनता काय निर्णय घेते हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पहिल्या आठवड्यात कोण बाहेर पडणार याची चर्चा रंगली आहे.