'तारक मेहता'साठी भिडे मास्तरांच्या लेकीला मिळत होतं 2.4 लाखांचं पॅकेज; आता अभिनय सोडून काय करतीये निधी भानुशाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2024 16:14 IST2024-01-21T16:04:41+5:302024-01-21T16:14:27+5:30

Nidhi bhanushali:ही मालिका सोडल्यानंतर निधी कोणत्याही दुसऱ्या मालिकेत किंवा कार्यक्रमात झळकली नाही. त्यामुळे ती सध्या काय करते हा प्रश्न प्रेक्षकांना पडतो.

छोट्या पडद्यावर तुफान गाजलेला कार्यक्रम म्हणजे तारक मेहता का उलटा चष्मा. गेल्या १६ वर्षांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत आहे.

या मालिकेतील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. त्यातलीच एक बालकलाकार म्हणजे निधी भानुशाली.

या मालिकेत निधीने भिडे मास्तरांच्या लेकीची सोनू भिडेची भूमिका साकारली होती.

निधीने ही मालिका सोडल्यानंतर त्यात अनेक बालकलाकारांनी सोनूची भूमिका साकारली. मात्र, सोनूची क्रेझ आजही प्रेक्षकांवर पाहायला मिळते.

२०१२ पासून सोनू तारक मेहतामध्ये काम करत होती. मात्र, २०१७ मध्ये तिने शिक्षण पूर्ण करण्यासाठी ब्रेक घेतला.

ही मालिका सोडल्यानंतर निधी कोणत्याही दुसऱ्या मालिकेत किंवा कार्यक्रमात झळकली नाही. त्यामुळे ती सध्या काय करते हा प्रश्न प्रेक्षकांना पडतो.

निधी तारक मेहतासाठी तब्बल २.४ लाख रुपये मानधन स्वीकारत होती. म्हणजे दररोज तिला ८ हजार रुपये फी मिळत होती.

निधी सध्या कलाविश्वापासून दूर आहे. ती एक ट्रॅव्हल ब्लॉगर असून तिचं स्वत:चं युट्यूब चॅनेल सुद्धा आहे.

निधी तिच्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून चांगली कमाई करते.