कधी वेस्टर्न तर कधी ट्रेडिशनल आऊटफिट! मिनाक्षी राठोडचं मॅटर्निटी फोटोशूट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 19:13 IST2022-04-13T18:51:13+5:302022-04-13T19:13:49+5:30

Meenakshi rathod: अलिकडेच तिने मॅटर्निटी फोटोशूट केलं आहे. यावेळी तिच्यासोबत तिचा पतीदेखील दिसून येत आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री मिनाक्षी राठोड गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. (फोटो सौजन्य: मिनाक्षी राठोड/ कैलास वाघमारे/ awphotography इन्स्टाग्राम पेज)

सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत देवकीची भूमिका साकारणारी मिनाक्षी लवकर आई होणार आहे.

अलिकडेच मिनाक्षीने सोशल मीडियावर तिच्या डोहाळ जेवणाचे फोटो शेअर करत गुड न्यूज शेअर केली.

मिनाक्षीने डोहाळ जेवणाचे फोटो शेअर केल्यानंतर तिने आणखी काही फोटो शेअर केले आहेत.

अलिकडेच तिने मॅटर्निटी फोटोशूट केलं आहे. यावेळी तिच्यासोबत तिचा पतीदेखील दिसून येत आहे.

मिनाक्षीने ट्रेडिशनल आणि वेस्टर्न अशा दोन्ही आऊटफिटमध्ये फोटोशूट केलं आहे.

सध्या सोशल मीडियावर मिनाक्षीचे हे फोटो व्हायरल होत आहेत.

फोटोशूटसाठी मिनाक्षी आणि कैलाशची खास पोझ

हिरव्या रंगाच्या साडीमध्येही मिनाक्षी सुंदर दिसत आहे.