देवकीचा रिअल लाइफ पार्टनरदेखील आहे अभिनेता; 'माझा होशील ना'मध्ये साकारलीये महत्त्वपूर्ण भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 08:00 AM2023-03-15T08:00:00+5:302023-03-15T08:00:00+5:30

Bhakti ratnaparkhi: भक्तीप्रमाणेच तिचा नवरादेखील कलाविश्वात सक्रीय असून 'माझा होशील ना' या मालिकेत तो झळकला आहे.

छोट्या पडद्यावरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' (sukh mhanje nakki kay asta) या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

या मालिकेतील गौरी आणि जयदीपला प्रेक्षकांनी जितकं प्रेम दिलं, तितकंच प्रेम देवकीला देत आहेत.

या मालिकेत देवकी ही भूमिका भक्ती रत्नपारखी हिने साकारली आहे.

भक्तीने यापूर्वी अग्गंबाई सूनबाई या मालिकेत मॅडी ही विनोदी व्यक्तीरेखा साकारली होती.

भक्तीप्रमाणेच तिचा नवरादेखील कलाविश्वात सक्रीय असून माझा होशील ना या मालिकेत तो झळकला आहे.

भक्तीच्या नवऱ्याचं नाव निखील रत्नपारखी असं असून तो मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता आहे.

निखीलने आजवरच्या कारकिर्दीत अनेक गाजलेल्या मालिका, चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

निखीलने ‘ओह माय गॉड’, ‘पहेली’, ‘जयंताभाई की लव्हस्टोरी’ यासारख्या हिंदी चित्रपटांत काम केले आहे.

त्याचप्रमाणे त्याने ‘नारबाची वाडी’, ‘व्हेंटिलेटर’, ‘सुपरस्टार’ यासारख्या मराठी चित्रपटात काम केले आहे. त्याच बरोबर त्याने अनेक टीव्ही शो आणि जाहिरातीत सुद्धा काम केले आहे.