झाला आनंद आली बहार! ३७ व्या वर्षी जुळ्या बाळांची आई होणार 'ही' अभिनेत्री? सोनोग्राफीचा फोटोच दाखवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 16:04 IST2026-04-03T15:35:52+5:302026-04-03T16:04:28+5:30

टीव्ही अभिनेत्रीतील एका प्रसिद्ध अभिनेत्रीला जुळी बाळं होणार असल्याची चर्चा आहे. वयाच्या ३७ व्या वर्षी ही अभिनेत्री जुळ्या बाळांना जन्म देणार आहे.

टीव्ही अभिनेत्रीतील एका प्रसिद्ध अभिनेत्रीला जुळी बाळं होणार असल्याची चर्चा आहे. वयाच्या ३७ व्या वर्षी ही अभिनेत्री जुळ्या बाळांना जन्म देणार आहे. तिचं नाव आहे सुरभी ज्योति (surbhi jyoti)

'नागिन' फेम सुरभी लवकरच आई होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली असून, तिच्या काही फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. सुरभीला जुळी मुले (Twins) होणार असल्याचा अंदाज नेटकऱ्यांकडून लावला जात असून सोशल मीडियावर 'डबल सेलिब्रेशन'च्या पोस्ट व्हायरल होत आहेत.

सोशल मीडियावर सुरभी ज्योतीचे काही नवीन फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये ती 'बेबी बंप' फ्लॉन्ट करताना दिसतेय. चौथ्या महिन्यातील सुरभीचे बेबी बंप पाहून ती जुळ्या बाळांना जन्म देणार, असे तिचे चाहते म्हणत आहेत.

याशिवाय सुरभीचा सोनाग्राफी रिपोर्टही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा रिपोर्ट सुरभीला जुळी मुलं होणार असल्याच्या चर्चांना पुष्टी देतो.

अर्थात याविषयी सुरभीकडून अधिकृत माहिती समोर आली नाही. तरी तिचे चाहते आतापासूनच 'डबल सेलिब्रेशन' म्हणत अभिनेत्रीचं अभिनंदन करत आहेत.

सुरभी ज्योतीचे लग्न व्यावसायिक सुमित सुरी याच्याशी झाले असून, त्यांच्या जोडीला चाहत्यांचे नेहमीच प्रेम मिळते. आता त्यांच्या आयुष्यात जुळ्या पाहुण्यांचं आगमन होणार असल्याने सर्वांना आनंद झाला आहे.

सुरभी गरोदर जरी असली तरीही ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात आहे. ती प्रेग्नंसीच्या काळात अनेक व्हिडीओ शेअर करत सर्वांचं मन जिंकतेय