‘सोनपरी’मधील ‘फ्रुटी’ झाली आता बरीच मोठी, लेटेस्ट फोटो पाहून ओळखणंही झालंय कठीण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2023 11:54 AM2023-10-21T11:54:57+5:302023-10-21T12:53:46+5:30

अनेक मालिकांमध्ये काम केलेले बालकलाकार आता मोठे झालेत. त्यांचे लेटेस्ट बघून त्यांना ओळखणं ही कठीण झालायं. सध्या ते कुठे आहेत, काय करतात, कसे दिसतात हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक असतात.

नव्वदच्या दशकात लहान मुलांसाठी बऱ्याच मालिका प्रसारीत होत होत्या. या मालिकांनी बच्चे कंपनीच्या मनावर अधिराज्य गाजवले होते.

या मालिकांमध्ये काम केलेल बरेच बालकलाकार आता मोठे झाले आहेत. काही आजही अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत तर काहींना या क्षेत्राला रामराम केला.

90च्याा दशकात सोनपरी ही मालिका चांगलीच गाजली होती. या मालिकेतील फ्रूटी ही आजही लोकांच्या चांगलीच लक्षात आहे. या मालिकेत परीची भूमिका मृणाल कुलकर्णी यांनी साकारली होती. तर फ्रुटीच्या भूमिकेत बालकलाकार तन्वी हेगडे झळकली होती.

फ्रुटीची भूमिका साकारलेली तन्वी आता मोठी झाली असून तिने मराठी चित्रपटात काम केलं आहे. ‘सोनपरी’ मालिका सुरू झाली होती तेव्हा तन्वी म्हणजेच फ्रूटी अवघ्या 3 वर्षांची होती आणि तिने करिअरला सुरुवात केली होती.

'जान की कसम' आणि 'गज गामिनी' या चित्रपटांमध्ये तन्वी बालकलाकाराच्या रूपात झळकली होती.

तिने 'राहुल', 'पिता', 'विरुद्ध', 'वाह! लाईफ हो तो ऐसी', 'चल चले', 'धुरंधर भाटवडेकर', 'अथांग', 'शिवा' या चित्रपटांसोबतच 'शाका लाका बूम बूम' आणि 'सोन परी' या मालिकांमध्ये अभिनय केला आहे.

तन्वी सध्या ती मॉडलिंग करते. तिने मराठी चित्रपटसृष्टीत काम करायला सुरुवात केली आहे. अलिप्त प्रेम योगायोग या चित्रपटात ती झळकली आहे.

तन्वीने तिची स्टाईल देखील बदलली असून ती या लूकमध्ये देखील खूप छान दिसत. मात्र अनेकांना तिला या लूकमध्ये ओळखणं कठीण जातेय.