Shri Krishna serial Yashoda aka damini kanwal shetty is very glamorous in real life PSC
कृष्णा या मालिकेतील यशोदा खऱ्या आायुष्यात आहेत खूपच ग्लॅमरस, फोटो पाहून बसेल धक्का By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 06:34 PM2020-05-12T18:34:09+5:302020-05-12T18:34:09+5:30Join usJoin usNext सध्या लॉकडाऊनच्या काळात प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या जुन्या मालिका पाहायला मिळत आहेत. कृष्णा ही जुनी मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. कृष्णा या मालिकेत दामिनी कंवल शेट्टी यांनी यशोदा ही भूमिका साकारली होती. यशोदाची भूमिका साकारलेल्या दामिनी या खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहेत. दामिनी यांनी 'श्रीकृष्णा' सोबतच 'अलिफ लैला' आणि परंपरा यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. दामिनी या अभिनेत्री असून निर्मात्या देखील आहेत. त्यांनी काही दाक्षिणात्य चित्रपटांची निर्मिती केली आहे. दामिनी सध्या अभिनयक्षेत्रात कार्यरत नसल्या तरी त्या त्यांच्या प्रोडक्शन हाऊसचे काम पाहातात. दामिनी यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड असून त्यांनी खूपच कमी वयात अभिनय करायला सुरुवात केली होती. दामिनी यांनी अनेक मालिकांमध्ये काम केले असले तरी कृष्णा या मालिकेमुळे त्यांना सगळ्यात जास्त लोकप्रियता मिळाली.टॅग्स :टेलिव्हिजनTelevision