सरकारांची रिअल लाइफ रुक्मिणी आहे साधीभोळी; स्टारडमपासून आहे कोसोदूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2023 17:00 IST2023-11-16T17:00:00+5:302023-11-16T17:00:00+5:30

Pradeep kothmire wife: चाहत्यांमध्ये सध्या प्रदीप यांच्या कुटुंबाची आणि त्यांच्या पत्नीची चर्चा रंगली आहे.

छोट्या पडद्यावर सध्या लोकप्रिय ठरत असलेली मालिका म्हणजे आप्पी आमची कलेक्टर.

या मालिकेतील प्रत्येक कलाकार सध्या प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे.

सध्या मालिकेतील सरकार म्हणजेच अभिनेता प्रदीप कोथमिरे यांची चर्चा रंगली आहे.

अभिनेता प्रदीप कोथमिरे सोशल मीडियावर सक्रीय असून त्यांनी अलिकडेच त्यांच्या कुटुंबासोबतचा फोटो शेअर केला.

प्रदीप यांचा फॅमिली फोटो पाहिल्यावर अनेकांनी त्यांच्या पत्नीचं कौतुक केलं आहे.

प्रदीप यांच्या पत्नीचं नाव नवनिता कोथमिरे असं असून त्या मालिकेतील सरकारांची पत्नी रुक्मिणी हिच्यासारखीच अत्यंत साधी आहे.

नवनिता या सोशल मीडियावर फारशा सक्रीय नाहीत.

नवनिता यांच्या साधेपणाची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे.