'साथ निभाना साथिया' फेम 'अहम जी' आठवतोय का? अभिनेत्याचं खरं नाव वाचून वाटेल आश्चर्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 14:20 IST2025-07-28T14:09:04+5:302025-07-28T14:20:49+5:30
आता कुठे आहे हा अभिनेता? हिट मालिका करुनही आज तो...

'साथ निभाना साथिया' या गाजलेल्या मालिकेतले सगळेच पात्र प्रेक्षकांना माहित आहेत. कोकिलाबेन, गोपी बहू, राशी बहू, अहम जी आणि जिगर जी या भूमिका खूपच गाजल्या.
कोरोनावेळी लॉकडाऊनमध्ये तर या मालिकेतले अनेक सीन्स व्हायरल झाले. गोपी बहूने तिच्या नवऱ्याचा म्हणजेच अहमजींचा लॅपटॉप धुतला. हा सीन तर आजही खूप व्हायरल होतो.
तसंच या मालिकेमधलाच एक सीन जिथे कोकिलाबेन राशीला 'रसोडे मे कौन था' असं विचारते. यावर तर यशराज मुखाटेने गाणंही बनवलं. त्या गाण्याने त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली.
मालिकेतील अहम जींची भूमिका साकारणारा अभिनेता आता कुठे आहे? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तसंच या अभिनेत्याचं खरं नाव माहितीये का?
'साथ निभाना साथिया'मध्ये मोदी हे गुजराती कुटुंब दाखवण्यात आलं आहे. यामध्ये अहम आणि जिगर हे दोन भाऊ आहेत. अहम सर्वात मोठा आहे. त्याची आई कोकिलाबेन तर पत्नी गोपी बहू आहे.
हीच अहम मोदीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचं खरं नाव 'मोहम्मद नाजिम खिलजी'(Mohammad Nazim Khilji) असं आहे. त्याने गुजराती भूमिका एकदम उत्तम साकारली आणि प्रेक्षकांचं प्रेमही मिळालं.
अभिनेता मोहम्मद नाजिमने नंतर 'तेरा मेरा साथ रहे' ही मालिका केली. तसंच त्याने 'मुंडा रॉकस्टार'या पंजाबी सिनेमातही काम केलं. गेल्या वर्षी तो 'शमशान चम्पा' या मालिकेत दिसला. मात्र ही मालिका केवळ २ महिनेच चालली.
'साथ निभाना साथिया'सारखी हिट मालिका करुनही सध्या मोहम्मद कामाच्या शोधात आहे. काम करणाऱ्या अभिनेत्याच्या भूमिकेसाठी सध्या ऑडिशन देत आहे असं त्याने खोचकपणे त्याच्या इन्स्टाग्राम बायकोमध्ये लिहिलं आहे.