Apoorva Mukhija : "मी सिंगल आहे, मला आता लग्न करायचंय; बॉयफ्रेंड शोधतेय, प्लीज कोणीतरी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 16:59 IST2025-07-02T16:54:39+5:302025-07-02T16:59:58+5:30

Apoorva Mukhija : अपूर्वा २३ वर्षांची आहे आणि आता तिला लग्न करायचंय.

अपूर्वा मखीजा ही समय रैनाच्या इंडियाज गॉट लेटेंट या शोमधून चर्चेत आली होती. आता ती द ट्रेटर्समध्ये दिसत आहे.

अपूर्वा २३ वर्षांची आहे आणि आता तिला लग्न करायचंय. पूरव झासोबत तिचं नाव जोडलं गेलं. मात्र तिने असं काहीच नसल्याचं म्हटलं आहे.

पापाराजी अकाऊंट वरिंदर चावलाला तिने इंटरव्ह्यू दिला. तिला तिच्या पुढच्या आयुष्याबद्दल काय प्लॅन आहे असा प्रश्न विचारण्यात आला होता.

"मला लग्न करायचं आहे, प्लीज कोणीतरी माझं लग्न लावून द्या. कारण मला आणखी व्हिडीओ बनवायचे नाहीत. मी थकली आहे. रिअॅलिटी शो करावा असं मला वाटत नाही."

"मला आता थोडा वेळ धीराने काम करावं लागेल. मला फक्त आता लग्न करायचं आहे. मी सिंगल आहे.मी कोणाशी बोलतही नाही."

"मी बॉयफ्रेंड शोधतेय, मला वाटतंय की मी स्वयंवर करावं. जिथे माझा थोडासा का होईना कंट्रोल असेल" असं अपूर्वा मखीजाने म्हटलं आहे.

अपूर्वा मखीजा सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असून ती नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. अपूर्वाचे असंख्य चाहते आहेत.