'हास्यजत्रा' नाही तर 'या' कारणासाठी प्रियदर्शनी इंदलकरने पुण्यातील ४ लाखांच्या नोकरीवर सोडलं पाणी

By देवेंद्र जाधव | Updated: July 30, 2025 15:07 IST2025-07-30T14:15:44+5:302025-07-30T15:07:18+5:30

प्रियदर्शनी इंदलकरने तब्बल ४ लाखांच्या नोकरीवर पाणी का सोडलं होतं? कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

प्रियदर्शनी इंदलकर ही 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील लोकप्रिय अभिनेत्री. प्रियदर्शनीला आपण हास्यजत्रेत विविध भूमिका साकारताना पाहिलंय

प्रियदर्शनी इंदलकरचं आज हास्यजत्रेच्या माध्यमातून जरी नाव असलं तरी सुरुवातीला तिने स्ट्रगलचा काळही बघितला आहे. इतकंच नव्हे इंजिनिअरींग करुन तिला चांगल्या पगाराची नोकरीही होती

मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत प्रियदर्शनीने हा किस्सा सांगितला. प्रियदर्शनीने IT इंजिनिअरींग केलंय. चांगले मार्क्स मिळवून ती पास झाली.

प्रियदर्शनी म्हणाली, इंजिनिअरींग केल्यावर पुण्याला बाणेरला कंपनी होती. तिथे अशीच मी मुलाखत द्यायला गेले आणि सिलेक्ट झाले. मला ४ लाखांचं पॅकेज मिळालं होतं.

प्रियदर्शनीने १५ दिवस नोकरी केली. त्यानंतर तिला NSD (नॅशनल स्कूल ऑफ ड्राम, दिल्ली) कडून मेल आला की, ती पुढच्या राऊंडसाठी सिलेक्ट झालेय. त्यानंतर प्रियदर्शनीने नोकरी सोडायचा निर्णय घेतला.

अशाप्रकारे NSD मध्ये प्रवेश घेता यावा म्हणून प्रियदर्शनीने ४ लाखांच्या नोकरीवर पाणी सोडलं. पण पुढे ज्यासाठी तिने नोकरी सोडली त्या NSD मध्ये तिचा प्रवेश झाला नाही.

परंतु तरीही निराश न होता प्रियदर्शनी नाटकांमधून काम करत राहिली. आणि शेवटी महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमध्ये तिला अभिनयाची संधी मिळाली आणि तिने या संधीचं सोनं केलं