'प्रेमाची गोष्ट मधील' साधी, सोज्वळ दिसणारी कोमल खऱ्या आयुष्यात दिसते खूपच सुंदर, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 15:03 IST2025-02-21T14:51:21+5:302025-02-21T15:03:07+5:30

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्रीचं सुंदर फोटोशूट, नेटकरी घायाळ.

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'प्रेमाची गोष्ट' ही मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांपैकी एक आहे. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे.

'प्रेमाची गोष्ट' या मालिकेचा चाहतावर्ग फार मोठा आहे. मालिकेतील सागर-मुक्ता तसेच सावनी, इंद्रा कोळी, बापू, कोमल आणि लकी ही पात्रे प्रेक्षकांना आपली वाटू लागली आहेत.

दरम्यान, या मालिकेमध्ये कोमल हे पात्र साकारणारी अभिनेत्री लक्ष्मी जयश्री सध्या चर्चेत आली आहे. अलिकडेच कोमलने मिहीरसोबत लग्न केलं असून ती आपल्या संसारात व्यस्त आहे.

नुकतेच अभिनेत्रीने सोशल मीडियावर साडी नेसून सुंदर फोटो शेअर केले आहेत.

मालिकेत साधी, सोज्वळ दिसणारी कोमल खऱ्या आयुष्यात खूपच सुंदर दिसते.

गुलाबी साडी त्यावर साजेसे असे दागिने परिधान करून अभिनेत्रीने साजशृंगार केला आहे.

"Expression is the key of elegance..." असं कॅप्शन अभिनेत्रीने या फोटोंना दिलं आहे.