प्राजक्ता माळी 'बिग बॉस मराठी'मध्ये जाणार? चाहत्याच्या प्रश्नावर दिलं दोनच शब्दात उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 11:34 IST2025-12-25T11:29:58+5:302025-12-25T11:34:06+5:30
मी कोणालाही माझा अनादर करु देणार नाही, असं का म्हणाली प्राजक्ता माळी?

अभिनेत्री प्राजक्ता माळीची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ आहे. प्राजक्ताच्या आयुष्यात काय घडतंय हे जाणून घेण्याचीही चाहत्यांना भलतीच उत्सुकता असते.

सध्या मराठी मनोरंजनविश्वात 'बिग बॉस मराठी'च्या पुढील सीझनची चर्चा आहे. या सीझनमध्ये कोण कोण सहभागी होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

'बिग बॉस'मध्ये नेहमी चर्चेतले चेहऱ्यांना संधी मिळते. याच अनुषंगाने प्राजक्ता माळीलाही एका चाहत्याने 'तू बिग बॉस मराठीमध्ये जाणार का?' असा प्रश्न विचारला.

यावर प्राजक्ताने दोनच शब्दात उत्तर दिलं. ती म्हणाली,'कधीच नाही'. सोशल मीडियावर आस्क मी सेशनमध्ये प्राजक्ताने चाहत्यांच्या इतरही प्रश्नांना उत्तरं दिली.

तू लग्न कधी करणार? चाहत्याच्या या प्रश्नावर प्राजक्ताने 'तुम्हाला खरंच मी लग्न करावं असं वाटतं का? असा प्रतिप्रश्न विचारत उत्तर देणं टाळलं.तसंच तिला पहिल्या क्रशबद्दल विचारण्यात आलं. यावर तिने 'सलमान खान... असं उत्तर दिलं.

येत्या नवीन वर्षासाठी प्राजक्ताचा संकल्प काय आहे? यावरही तिने खास उत्तर दिलं. ती म्हणाली, "मी कोणालाही माझा अनादर करु देणार नाही. स्वत:बद्दल आत्मियता असणं हे दुसऱ्यांबद्दलच्या आत्मियतेपेक्षा जास्त महत्वाचं आहे".

प्राजक्ता लवकरच 'देवखेळ' या आगामी वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. यामध्ये तिच्यासोबत अंकुश चौधरीही आहे.

















