"प्राजक्ता तू लग्न कधी करणार?" खाजगी प्रश्न विचारणाऱ्या चाहत्याला अभिनेत्रीचं जशास तसं उत्तर, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 09:01 IST2026-03-31T08:56:28+5:302026-03-31T09:01:24+5:30

प्राजक्ताने नुकतंच इन्स्टाग्रामवर ask me सेशन घेतलं होतं. यामध्ये तिने चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली.

प्राजक्ता माळी हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय चेहरा आहे. तिचा चाहता वर्ग मोठा असून प्राजक्ता सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.

प्राजक्ता सोशल मीडियावरुन चाहत्यांना करिअर आणि वैयक्तिक आयुष्यातले अपडेट्स देत असते.

प्राजक्ताने नुकतंच इन्स्टाग्रामवर ask me सेशन घेतलं होतं. यामध्ये तिने चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली.

एका चाहत्याने प्राजक्ताला तिच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारला. "नॅशनल प्रश्न...लग्न कधी करणार?" असा प्रश्न चाहत्याने प्राजक्ताला विचारला.

खाजगी प्रश्न विचारणाऱ्या चाहत्याला प्राजक्ताने जशास तसं उत्तर दिलं.

"हा माझ्या आईवडिलांचा प्रश्न आहे...तुझा नाही", असं प्राजक्ता चाहत्याला म्हणाली.

३६ वर्षीय प्राजक्ता अजूनही अविवाहित आहे. प्राजक्ताने अनेक मालिका आणि सिनेमांमध्येही काम केलं आहे.

जुळून येती रेशीमगाठी मालिकेतून ती घराघरात पोहोचली होती. सध्या ती महाराष्ट्राची हास्यजत्राचं सूत्रसंचालन करत आहे.

अलिकडेच प्रदर्शित झालेल्या देवखेळ वेब सीरिजमध्ये ती दिसली होती.

प्राजक्ता अभिनेत्री असण्यासोबतच एक बिजनेस वुमनही आहे. तिचा स्वत:चा दागिन्यांचा ब्रँड आणि निर्मिती संस्था आहे.