१० वर्षांपूर्वी अशी दिसायची पवित्रा पुनिया; फोटो पाहिल्यावर ओळखणंही आहे कठीण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 14:59 IST2021-09-21T14:52:23+5:302021-09-21T14:59:08+5:30

Pavitra Punia: पवित्राचे जुने फोटो तुम्ही कधी पाहिले आहेत का?

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री पवित्रा पुनिया कायमच तिच्या बोल्ड आणि हॉट फोटोशूटमुळे चर्चेत असते.

अलिकडेच तिने एक ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे.

स्टायलिश फोटोशूटमुळे चर्चेत येणाऱ्या पवित्राच्या सौंदर्याची कायमच चाहत्यांमध्ये चर्चा असते. मात्र, पवित्राचे जुने फोटो तुम्ही कधी पाहिले आहेत का?

बिग बॉस १४ मध्ये झळकलेली पवित्रा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे.

कायम ग्लॅमरस लूकमध्ये झळकणाऱ्या पवित्राचे जुने फोटो पाहिल्यावर तिला ओळखणंदेखील अनेकांना कठीण होईल.

पवित्राने अभिनेता सिद्धार्थ शुक्लासोबत काही मालिकांमध्ये काम केलं आहे.

२०११ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या लव यू जिंदगी या मालिकेत पवित्रा मुख्य भूमिकेत झळकली होती.