'अनुपमा' नाही तर या मालिकेचा रिमेक आहे 'आई कुठे काय करते', तुम्हाला माहीत आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 04:56 PM2024-03-18T16:56:55+5:302024-03-18T17:01:47+5:30

मालिकेचं कथानक सारखेच असल्यामुळे 'आई कुठे काय करते' ही मालिका 'अनुपमा' या हिंदी मालिकेचा रिमेक असल्याचं अनेकांना वाटतं. पण, तसं नाही.

छोट्या पडद्यावरील काही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करून जातात. अशाच मालिकांपैकी एक म्हणजे स्टार प्रवाह वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' ही मालिका.

मालिका सुरू झाल्यानंतर अगदी अल्पावधीतच 'आई कुठे काय करते'ला प्रेक्षकांचं प्रेम मिळालं. खरं तर पहिल्या प्रोमो पासूनच या मालिकेने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

'आई कुठे काय करते' या मालिकेला मिळालेल्या लोकप्रियतेनंतर याचा हिंदी रिमेक करण्यात आला आणि स्टार प्लसवर 'अनुपमा' ही मालिका सुरू करण्यात आली.

'आई कुठे काय करते'मध्ये अरुंधती ही भूमिका साकारून अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर घराघरात पोहोचली.

तर 'अनुपमा' या भूमिकेमुळे अभिनेत्री रुपाली गांगुलीच्या लोकप्रियतेत भर पडली.

मालिकेचं कथानक सारखेच असल्यामुळे 'आई कुठे काय करते' ही मालिका 'अनुपमा' या हिंदी मालिकेचा रिमेक असल्याचं अनेकांना वाटतं. पण, तसं नाही.

'आई कुठे काय करते' ही मालिका 'श्रीमोयी' या बंगाली मालिकेचा रिमेक आहे. ही मालिका स्टार जलसा या चॅनेलवर प्रसारित होती होती.

१० जूनला या मालिकेचा पहिला भाग प्रसारित करण्यात आला होता. त्यानंतर जवळपास अडीच वर्षांनी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला.

तर 'आई कुठे काय करते' ही मालिका डिसेंबर २०१९ मध्ये सुरू झाली होती. चार वर्षांनंतरही ही मालिका प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करत आहे.

'आई कुठे काय करते' मालिकेबरोबरच त्यातील कलाकारांवरही प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. सध्या ही मालिका उत्कंठावर्धक वळणावर आहे.

या मालिकेत अरुंधतीचा दुसरा नवरा आशुतोषचं अपघाती निधन झाल्याचं दाखवल्याने प्रेक्षक नाराज आहेत. पण, तरीही मालिकेची लोकप्रियता कमी झालेली नाही.