"त्याचा धर्म वेगळा आहे...", अरबाजशी लग्नाबद्दल काय म्हणाली निक्की तांबोळी?; देशात हिंदू-मुस्लिम...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 16:28 IST2025-05-06T16:08:43+5:302025-05-06T16:28:22+5:30

अरबाज आणि मी 'या' विषयांवर बोलतो, नक्की काय म्हणाली निक्की?

'बिग बॉस मराठी ५' मुळे मराठी प्रेक्षकांच्या परिचयाची झालेली अभिनेत्री निक्की तांबोळी (Nikki Tamboli). बिग बॉसच्या या सीझनमधून निक्की आणि अरबाज पटेलची जोडी चांगलीच हिट झाली.

निक्की तांबोळीने नंतर 'सेलिब्रिटी मास्टरशेफ' हा रिएलिटी शोही केला. यामध्ये ती टॉपपर्यंत पोहोचली. निक्की सध्या रिअॅलिटी क्वीन झाली आहे.

निक्की आणि अरबाज यांची जोडी सोशल मीडियावरही हिट आहे. दोघांही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले आहेत. दरम्यान नुकतंच एका मुलाखतीत निक्कीने तिच्या फॅमिली प्लॅनिंगचा खुलासा केला.

'पिंकव्हिला'ला दिलेल्या मुलाखतीत निक्की म्हणाली, "इंडस्ट्रीत टिकायचं असेल तर तुम्हाला सेलिब्रिटींसोबत मैत्री करावीच लागते यावर माझा विश्वास नाही. मी माझ्या करिअरकडे आणि भविष्याकडे वेगळ्या नजरेने बघते."

"मला मोठं कुटुंब आवडतं. मला लग्न करायचं आहे. चार मुलांना जन्म द्यायचा आहे. जॉइंट फॅमिलीमध्ये राहायचं आहे. जिथे आमच्या दोघांचेही आईवडील असतील. मला असं राहायला आवडेल."

"मला काम करायला आवडतं. स्वयंपाक करायला आवडतो. मी खूप घरगुती व्यक्ती आहे. करिअरच्या सुरुवातीला मी रिएलिटी शो करताना काहीही डिमांड करायचे नाही. पण आज या स्टेजवर पोहोचल्यावर मी मी माझ्या डिमांड ठेवते."

"अरबाज आणि मी लग्न, मुलं याविषयी गप्पा मारत नाही. आम्ही फक्त कामाबद्दल चर्चा करतो. जगात इतर जे इश्यू होत आहेत त्यावर बोलतो."

"तो वेगळ्या धर्माचा आहे. कधी हिंदू कधी मुस्लिम यावरुन देशात काय काय घडत आहे. या सगळ्यात आम्ही फक्त एकमेकांना शांत ठेवत आहोत. आम्ही भविष्य, फॅमिली प्लॅनिंगवर यावर बोलतच नाही. देशात काय सुरु आहे आणि आपण काय केलं पाहिजे यावर आम्ही बोलतो."