Nia Sharma : संस्कारी बहू ते बोल्ड अभिनेत्री ! १२ वर्षांत Nia Sharmaचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 01:51 PM2022-09-16T13:51:33+5:302022-09-16T14:44:37+5:30

Nia Sharma transformation : निया शर्मा आता पूर्वीपेक्षा खूपच स्टायलिश आणि बोल्ड झाली आहे. तिचं ट्रान्सफॉर्मेशन थक्क करणार आहे.

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री Nia Sharma आज प्रचंड लोकप्रिय अभिनेत्री बनली आहे. नियाने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 2010 मध्ये काली - एक अग्निपरीक्षा या टीव्ही शोमधून केली होती ज्यामध्ये तिने अनु नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती. (Photo Instagram)

यानंतर ती टीव्ही सीरियल बेहेनमध्ये निशा मेहताच्या भूमिकेत दिसली. नियाने १२ वर्षांपूर्वी तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती आणि गेल्या काही वर्षांत तिच्यात जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन झालं आहे. (Photo Instagram)

नियाने प्रसिद्ध टीव्ही मालिका जमाई राजामध्येही काम केले होते, ज्यामध्ये ती अभिनेता रवी दुबेसोबत दिसली होती, या शोमध्ये तिने रोशनी पटेलची भूमिका साकारली होती. (Photo Instagram)

निया आता पूर्वीपेक्षा खूपच स्टायलिश आणि ग्लॅमरस झाली आहे. ती अनेकदा तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (Photo Instagram)

निया शर्माला सलग दोन वेळा ब्रिटीश स्थित ईस्टर्न आय वृत्तपत्राच्या टॉप 50 सेक्सीएस्ट आशियाई महिलांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले होते. (Photo Instagram)

नियाने तिच्या करिअरमध्ये फारशा मालिका केल्या नाहीत. पण तिने ज्या काही भूमिका केल्यात त्यात आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. (Photo Instagram)

नियामध्ये रोज नवनवीन बदल पाहायला मिळत होते. अभिनेत्रीने अनेक फोटोशूट केले. नियाचे प्रत्येक फोटोशूट चाहत्यांमध्ये चांगलेच व्हायरल झाले असते.(Photo Instagram)

विक्रम भट यांची 'ट्विस्टेड' ही वेबसीरिज केली. या वेब सीरिजने चाहत्यांसमोर नियाची संपूर्ण इमेजच बदलून टाकली. (Photo Instagram)

ग्रे शेडच्या भूमिकेत निया इतकी प्रभावी दिसू शकते, याची कोणालाच अपेक्षा नव्हती. प्रेक्षकांसाठी हे आणखी एक आश्चर्यच होतं.(Photo Instagram)