आई मायेचं कवच! सुहानीची भूमिका साकारणारी 'ही' अभिनेत्री आहे तरी कोण?; खऱ्या आयुष्यात आहे खूपच ग्लॅमरस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 18:09 IST2021-12-20T18:04:34+5:302021-12-20T18:09:03+5:30

Anushka pimputkar: प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये सुहानी अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. त्यामुळे ही सुहानी नेमकी कोण? या पूर्वी ती कोणत्या मालिका, चित्रपटांमध्ये झळकलीये हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

छोट्या पडद्यावर सध्या अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यामध्येच सध्या एक नव्या मालिकेची चर्चा रंगली आहे. ही मालिका म्हणजे 'आई मायेचं कवच'.

अभिनेत्री भार्गवी चिरमुले या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार असून ती आईच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

भार्गवी चिरमुले हिला प्रत्येक प्रेक्षक ओळखतो. त्यामुळे तिच्या नावाची कायमच चर्चा रंगत असते. परंतु, या मालिकेचा प्रोमो पाहिल्यापासून एका वेगळ्याच अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे.

प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये सुहानी अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. त्यामुळे ही सुहानी नेमकी कोण? या पूर्वी ती कोणत्या मालिका, चित्रपटांमध्ये झळकलीये हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

या मालिकेत सुहानीची म्हणजेच भार्गवी चिरमुलेच्या मुलीची भूमिका अभिनेत्री अनुष्का पिंपुटकर साकारत आहे.

अनुष्का मराठी कलाविश्वातील नवीन चेहरा असून यापूर्वी तिने एका चित्रपटात काम केलं आहे.

‘८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी’ या चित्रपटात अनुष्का झळकली आहे.

अनुष्का उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक मॉडेलदेखील आहे.

अनुष्का सोशल मीडियावर सक्रीय असून अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.

सोशल मीडियावर अनुष्काने शेअर केलेला सुंदर फोटो