हुबेहुब आईची कॉपीच! जुई गडकरीच्या आईला पाहिलंत का? अभिनेत्रीने शेअर केले खास फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2024 19:00 IST2024-05-12T19:00:00+5:302024-05-12T19:00:02+5:30
'ठरलं तर मग' फेम जुई गडकरीने शेअर केले आईसोबतचे खास फोटो

जुई गडकरी हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय चेहरा आहे. 'पुढचं पाऊल' मालिकेतून जुई घराघरात पोहोचली. या मालिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली.
जुई सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेकदा जुई करिअरबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अपडेटही चाहत्यांना देत असते.
आज मदर्स डे निमित्ताने जुईने तिच्या आईबरोबरचे काही खास फोटो शेअर केले आहेत.
हे फोटो शेअर करत जुईने तिच्या आईला मदर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
जुईने शेअर केलेल्या तिच्या आईबरोबरच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
हे फोटो पाहून जुई जणू तिच्या आईची हुबेहुब कॉपी असल्याचंच दिसत आहे.
सध्या जुई ठरलं तर मग या मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकून घेत आहे.