लग्नाआधीच गरोदर, चार महिन्यात वडिलांचा मृत्यू; खडतर राहिलंय मराठी अभिनेत्रीचं खाजगी आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 10:39 AM2023-05-22T10:39:38+5:302023-05-22T10:57:29+5:30

16 व्या वर्षी लग्नाआधीच गरोदर राहिली होती मराठी अभिनेत्री

बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi) पहिल्याच सिझनची विजेती ठरलेली अभिनेत्री मेघा धाडे (Megha Dhade) आज 39 वा वाढदिवस साजरा करत आहे. बडबडा स्वभाव आणि मैत्रीसाठी काहीही करणारी मेघा बिग बॉसमुळे सर्वांचीच लाडकी बनली.

बिग बॉसच्या घरातील भांडणं असो, मैत्रीचे किस्से असो किंवा वेगवेगळे टास्क असो मेघा नेहमीच तत्पर असायची. शेवटपर्यंत ती स्ट्रॉंग खेळ खेळत राहिली आणि अखेर पहिल्याच सिझनचं विजेतेपद पटकावत तिने बाजी मारलीच. मेघाचं आयुष्य खुली किताब आहे. तिने स्वत: बिग बॉसमध्ये तिच्या खाजगी आयुष्याबाबतीत अनेक खुलासे केले होते.

मेघा मूळची जळगावची. आधीपासूनच तिला अभिनय क्षेत्रात यायची इच्छा होती. मात्र तिच्या आईवडिलांचा कायम विरोध होता. त्यांचा विरोधाला झुगारुन ती मुंबईत आली. मुंबईत कोणतीही ओळख नसताना, राहायला घर नसताना तिने रेल्वे प्लॅटफॉर्मवर दिवस काढले.

पण मेघाच्या आयुष्यातलं सर्वात मोठं सत्य हे की ती लग्नाआधीच गरोदर राहिली होती. वयाच्या १५ व्या वर्षापासूनच तिचं जळगावमधील एका मुलाबरोबर अफेअर होतं. दरम्यान ती गरोदरही राहिली. पाचव्या महिन्यात तिला आपण गरोदर असल्याचं समजलं.

मेघाच्या गरोदरपणाबद्दल कळताच तिच्या वडिलांना धक्काच बसला. दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. वडिलांच्या निधनामुळे सगळा दोष मेघाला देण्यात आला. घरच्यांनी तिला दूर सारलं.

लग्नाआधीच प्रेग्रंट राहिल्याने तिचं आयुष्य नक्कीच सोप्पं नव्हतं. तरी तिने न खचता करिअरकडे लक्ष दिलं. लेक साक्षीचा एकटीने सांभाळ केला. यानंतर ती एका अभिनेत्यासोबतही रिलेशनशिपमध्ये होती. मात्र त्याच्या विचित्र स्वभावामुळे त्यांचं नातं तुटलं.

काही वर्षांनी घरच्यांच्या सांगण्यावरुन तिने आदित्या पावस्करसोबत अरेंज मॅरेज केलं. आदित्यचं हे दुसरं लग्न होतं. पहिल्या लग्नापासून त्यालाही १५ वर्षांचा मुलगा आहे. तर आदित्य नॅशनल स्टॉक एक्सेंजमध्ये व्हाईस प्रेसिडेण्ट पदावर आहे.

मेघाचं आयुष्य आता स्थिरावलं आहे. ती तिच्या संसारात रमली आहे. तसंच बिग बॉसचं विजेतेपद पटकावल्यानंतर तिला आदर मिळालाय. तिचा चाहतावर्गही वाढलाय. या शोमधून तिची आणि सई लोकुरची घट्ट मैत्री झाली.

मेघा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. लेक साक्षी आणि कुटुंबाबरोबर ती फोटो शेअर करत असते.