PHOTOS : खल्लास! रुचिरा जाधवच्या या ग्लॅमरस फोटोंवर व्हाल फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 12:11 PM2021-06-02T12:11:56+5:302021-06-02T12:24:10+5:30

Ruchira Jadhav : हटके फोटो... 'माझ्या नवऱ्याची बायको'मधील माया खऱ्या आयुष्यात आहे खूप बोल्ड

‘माझ्या नव-याची बायको’ फेम अभिनेत्री रुचिरा जाधव हिच्या फोटोंनी सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.

रूचिराने सोशल मीडियावर समुद्र किना-यावरचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.

मावळतीच्या सूर्याच्या साक्षीने केलेल्या या फोटोशूटमध्ये रूचिरा ग्लॅमरस पोज देताना दिसतेय.

केशरी रंगाचा तिचा ड्रेस आणि तिच्या अदांनी चाहत्यांना जणू वेड लावले आहे. साहजिकच तिचे हे फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत.

रुचिरा सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टिव्ह असते. आपले हटके फोटो आपल्या चाहत्यांसोबत ती शेअर करत असते.

माझ्या नव-याची बायको या मालिकेत रुचिराने मायाची भूमिका उत्तम साकारली होती.

त्याआधी बेदुणे दहा, माझे पती सौभाग्यवती, प्रेम हे, तुज्यावाचून करमेना या मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत.

शुद्ध देसी या युट्यूब चॅनलवरील 'माझ्या मित्राची गर्लफ्रेंड' या वेब सीरिजमध्येही तिने काम केले आहे.

'बंच ऑफ रेड रोजेस' हे नाटक आणि 'लव्ह लफडे' या चित्रपटात तिने भूमिका साकारली आहे.