Photos : ‘माझी तुझी रेशीमगाठ’मधील नेहाचं नवं फोटोशूट, पाहून तुम्हीही म्हणाल झक्कास
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 14:53 IST2022-02-23T14:46:24+5:302022-02-23T14:53:26+5:30
Prarthna Behere Photoshoot : ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतील साधी, सोज्वळ नेहा अर्थात ही भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिच्या ग्लॅमरस फोटोंनी सध्या चाहत्यांना वेड लावलं आहे.

‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतील साधी, सोज्वळ नेहा अर्थात ही भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिच्या ग्लॅमरस फोटोंनी सध्या चाहत्यांना वेड लावलं आहे.
पडद्यावर साध्या सोज्वळ रूपात दिसणारी प्रार्थना रिअल लाईफमध्ये खूपच ग्लॅमरस आहे. तिचे हे फोटो पाहून तुम्हालाही खात्री पटेल.
प्रार्थनाने सध्या तिचे नवे ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिची एक एक अदा वेड लावणारी आहे.
प्रार्थना सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपले फोटो व व्हिडीओ शेअर करत असते.
प्रार्थनाने आधी पवित्र रिश्ता मालिकेतून छोटा पडदा गाजवला. त्यानंतर जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा या मराठी चित्रपटातून पदार्पण करत प्रेक्षकांची मनं जिंकली.
जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा, कॉफी आणि बरंच काही, मितवा, मिस्टर अँड मिसेस सदाचारी, फुगे, व्हाट्सअँप लग्न यासारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटात प्रार्थना बेहेरे झळकली.
प्रार्थनाने अभिषेक जावकरसह लग्न केले आहे. प्रार्थना आणि तिचा पती अभिषेक जावकर हे चित्रपटसृष्टीतील एक गोड दाम्पत्य म्हणून ओळखलं जातं.