मराठमोळ्या लूकला रमाने दिला वेस्टर्न टच; स्ट्रेपलेस ब्लाऊज परिधान करत रेवती लेलेने केलं ग्लॅमरस फोटोशू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 14:48 IST2022-03-22T14:44:45+5:302022-03-22T14:48:51+5:30
Revati lele:रमा आणि माधवराव पेशवे यांच्या जीवनावर आधारित 'स्वामिनी' या मालिकेत रेवतीने मोठ्या रमाची भूमिका साकारली होती.

रेवती लेले हे नाव सध्याच्या घडीला कोणत्याही मराठी प्रेक्षकवर्गासाठी नवीन नाही.
रमा आणि माधवराव पेशवे यांच्या जीवनावर आधारित 'स्वामिनी' या मालिकेत रेवतीने मोठ्या रमाची भूमिका साकारली होती.
या मालिकेमुळे रेवती घराघरात पोहोचली. त्यामुळे आज तिचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं.
रेवती मूळची जळगावची असून ती अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्तम मॉडेलदेखील आहे.
कलाविश्वाप्रमाणेच रेवती सोशल मीडियावर सक्रीय असून ती तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
अलिकडेच तिने साडीतील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये तिने हिरव्या रंगाची साडी नेसली असून त्यावर स्ट्रेपलेस ब्लाऊज परिधान केला आहे.
मराठमोळ्या लूकला तिने वेस्टर्न टच दिल्यामुळे हे फोटो चर्चेत येत आहेत.
रेवती ही एक कथक डान्सर आहे.