'रात्रीस खेळ चाले' मध्ये भिवरीची भूमिका कोणी साकारलीये माहितीये? खऱ्या आयुष्यात ही अभिनेत्री आहे प्रचंड ग्लॅमरस

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 03:55 PM2022-02-17T15:55:59+5:302022-02-17T16:01:23+5:30

Ratris khel chale:भिवरीचे विसकटलेले केस आणि पांढरे डोळे पाहून अनेक जणांची आजही घाबरगुंडी उडते. परंतु, मालिकेत ही भूमिका साकारणारी अभिनेत्री खऱ्या आयुष्यात प्रचंड सुंदर आणि ग्लॅमरस दिसते.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणजे रात्रीस खेळ चाले. मालिकेत सातत्याने वाढत जाणारं गुढ, रहस्य यामुळे ही मालिका लोकप्रिय झाली.

या मालिकेच्या कथानकासह त्यातील काही कलाकारही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहेत. यातील अण्णा आणि शेवंता यांच्या लोकप्रियतेविषयी तर काही वेगळं सांगायची गरज नाही.

परंतु, आण्णा आणि शेवंताप्रमाणेच त्यातील काही अन्य काही भूमिकाही गाजल्या. त्यातलीच एक भूमिका म्हणजे भिवरी.

आण्णांच्या प्रेमपाशात अडकलेल्या भिवरीचा आण्णा निर्घृणपणे खून करतात. त्यामुळे त्यांचा बदला घेण्यासाठी भिवरी पुन्हा येते.

मालिकेतील दत्ता हा माईंचा नव्हे तर भिवरीचा लेक आहे. त्यामुळे आपल्या लेकासाठी आणि आण्णांचा बदला घेण्यासाठी भिवरी सतत नाईकांच्या वाड्यात फिरत असते.

भिवरीचे विसकटलेले केस आणि पांढरे डोळे पाहून अनेक जणांची आजही घाबरगुंडी उडते. परंतु, मालिकेत ही भूमिका साकारणारी अभिनेत्री खऱ्या आयुष्यात प्रचंड सुंदर आणि ग्लॅमरस दिसते.

रात्रीस खेळ चाले या मालिकेत भिवरी ही भूमिका अभिनेत्री दिक्षा सोनावणे (Diksha Sonawane) हिने साकारली आहे.

दिक्षा खऱ्या आयुष्यात प्रचंड ग्लॅमरस दिसत असून तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

दिक्षाने या मालिकेव्यतिरिक्त अन्य अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.

दिक्षा सोशल मीडियावर सक्रीय असून अनेकदा तिच्या ग्लॅमरस फोटोची चर्चा रंगत असते.