'तुझ्या सोबतीने' मालिकेतील नुपूर खऱ्या आयुष्यात दिसते खूपच सुंदर! फोटो पाहून कोणीही होईल घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 17:38 IST2026-01-29T17:15:25+5:302026-01-29T17:38:02+5:30

खऱ्या आयुष्यात खूपच सुंदर दिसते 'तुझ्या सोबतीने' मालिकेती नुपूर! फोटो पाहून चाहते प्रेमात

स्टार प्रवाह वाहिनीवर १९ जानेवारी २०२६ पासून तुझ्या सोबतीने ही नवीकोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. अगदी अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवली.

मालिकेचं आगळंवेगळं कथानक आणि कलाकारांचं काम प्रेक्षकांना प्रचंड आवडलं आहे.

मालिकेत अभिनेत्री एतशा सांझगिरी आणि अजिंक्य ननावरे हे दोन फ्रेश चेहरे पाहायला मिळत आहेत.

नुपूरच्या नावाच्या मुलीच्या अवतीभोवती ही कथा गुंफण्यात आली आहे. ही व्यक्तिरेखा एतशा संझगिरी साकारते आहे. मालिकेत तिने साकारलेली साधी, सुसंस्कृत आणि समजूतदार असणारी नुपूर अनेकांना भावली आहे.

'तुझ्या सोबतीने' मालिकेत नुपूरची भूमिका साकारणारी एतशा खऱ्या आयुष्यात मात्र खूपच सुंदर दिसते.

सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो, व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात.

एतशाचं इन्स्टाग्राम अकाउंट पाहिल्यानंतर तिच्या सौंदर्यावर कोणीही घायाळ होईल एवढी ती ग्लॅमरस आणि सुंदर आहे.